Mukta Barve : लग्नाच्या विषयावर मुक्ता बर्वे नेमकं काय म्हणाली? सोशल मीडियावर 'त्या' वक्तव्याची चर्चा

Mukta Barve Talk On Marriage : मराठमोळी अभिनेत्री मुक्ता बर्वेने एका मुलाखतीत लग्न संस्थेबद्दल आपले मत मांडले आहे. ती नेमकं काय म्हणाली, जाणून घेऊयात.
Mukta Barve Talk On Marriage
Mukta BarveSAAM TV
Published On
Summary

मुक्ता बर्वेचा नुकताच 'असंभव' चित्रपट रिलीज झाला आहे.

मुक्ताने लग्न संस्थेबद्दल आपले मत मांडले आहे.

मुक्ता बर्वे ही मराठीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

मराठमोळी अभिनेत्री मुक्ता बर्वे सध्या तिचा चित्रपट 'असंभव'मुळे चांगलीच चर्चेत आहे. आजवर तिने अनेक हिट चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केले आहे. तिच्या अभिनयाचे चाहते दिवाने आहे. नुकतेच 'आरपार'ला दिलेल्या मुलाखतीत लग्न, रिलेशनशिप यावर स्पष्ट मत मांडले आहे. ज्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा पाहायला मिळत आहे. लग्नाबद्दल बोलताना मुक्ता म्हणाली, "मला एकटं राहायला आवडतं..."

लग्नासाठी इच्छुक मुलांना त्यांच्यापेक्षा यशस्वी, जास्त पैसे कमावणारी, समाजात मोठं नाव कमावलेली मुलगी नको असत. कारण घरीच स्पर्धा सुरू होता. तुला असा कधी अनुभव आला आहे का? असा प्रश्न मुलाखतीत विचारण्यात आला तेव्हा मुक्ता बर्वे म्हणाली की, "नाही. मी लग्नच नाही केले. रिलेशनशिपमध्ये अशा अडचणी येत नाहीत. आधी लग्न संस्थेत असा सगळा गोंधळ होता. आता नसेल कदाचित कारण प्रत्येक जण नवीन शिकत आहे. नोकऱ्या सोडतात आणि नवीन शिकतात. कामातून ब्रेक घेतात. तसेच काही जोडप्यांमध्ये एक पैसे कमावतो तर काही आपले छंद जोपासताना दिसतो. असे दृश्य काही ठिकाणी दिसते. मी रिलेशनशिपमध्ये असताना असे काही झाले नाही. "

एकटेपणा बद्दल बोलताना मुक्ता म्हणाली, "मला एकटं राहायला आवडतं. कारण मला माझी कंपनी खूप आवडते. मला एका वेळेनंतर कारमध्ये ड्रायव्हरही नको असतो. एकटेपणा हा प्रत्येकाच्या स्वभावानुसार असतो. मी माझ्या कामात खूप गुंतलेली असते. काम करताना मला मजा येते. मी ज्या क्षेत्रात आहे तिथे माझ्या आजूबाजूला अनेक माणसे असतात. त्यांना बोलायला, मतं मांडायला आणि व्यक्त व्हायला खूप आवडते. पण मला एकटं राहायला आवडते. मी ब्रेक घेते. फिरायला जाते. भरपूर वाचन करते. मला जास्त गप्पा मारायला आवडत नाही. म्हणून मी घरी असते. मी छंड जोपासते. सीरिज, सिनेमा पाहते. "

'असंभव' हा थरारक आणि रहस्यमय चित्रपट 21 नोव्हेंबर 2025 ला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. 'असंभव'चे दिग्दर्शन सचित पाटीलने केले असून पुष्कर श्रोत्री यांनी सह-दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. सचित पाटील, मुक्ता बर्वे, प्रिया बापट आणि संदीप कुलकर्णी या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकले आहेत. मुक्ता बर्वेच्या डोळ्यांतील भीती- शोध, प्रिया बापटचे गूढ व्यक्तिमत्त्व, सचित पाटीलचा उत्तरांच्या शोधात असलेला प्रवास यामुळे चित्रपट अधिकच रहस्यमय होत जातो.

Mukta Barve Talk On Marriage
Masti 4 vs 120 Bahadur vs De De Pyaar De 2 : रितेश, अजय, फरहान रविवारी कोणाचा चित्रपट हाऊसफुल? '120 बहादूर' ठरतोय वरचढ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com