Famous Director : मातृछत्र हरपले! प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या आईचे निधन, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

Famous Director Mother Death : प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शकाच्या आईचे निधन झाले आहे. आईच्या निधनाने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.
Famous Director Mother Death
Famous Director Mother Death saam tv
Published On
Summary

दिग्दर्शकाच्या आईचे निधन

कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

नातीने आजीसाठी केली खास पोस्ट

मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईचे निधन झाले. प्रसिद्ध तेलुगू चित्रपट दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांची आई अम्मजी यांचे निधन झाले आहे. पुरी जगन्नाथ यांची मुलगी पवित्रा हिने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर करून आजीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

Famous Director Mother Death
Famous Director Mother Deathsaam tv

पवित्रा पुरीच्या पोस्टनुसार त्यांच्या आजीचे निधन शनिवारी 25 जुलै रोजी झाले. वयाच्या 96 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पोस्टमध्ये पवित्रा पुरी यांनी आजीसोबतचे दोन सुंदर फोटो शेअर केले आहे. त्याला खास कॅप्शन दिले आहे. त्यांनी लिहिलं की, "आता मला 'चिन्नथल्ली' कोण म्हणेल? कोण मला इतक्या प्रेमाने किस करेल? मी तुझ्यासोबत आणखी एक दिवस घालवू शकले असते तर चांगले झाले असते. मी तुझ्या 96 व्या वाढदिवशी जसे केले होते तसे मी तुला सर्वात मोठी मिठी देईन. आजी, मला तुझी आठवण येते."

पुरी जगन्नाथ यांच्या दुःखाच्या काळात इंडस्ट्री त्यांच्यासोबत आहे. कलाकारांनी आणि चाहत्यांनी अभिनेत्याच्या आईवर श्रद्धांजली वाहिली आहे. या दु:खद काळात अनेकांनी शोक व्यक्त केला आणि पुरी जगन्नाध आणि त्यांच्या कुटुंबियांना बळ देण्याची इच्छा व्यक्त केली.पुरी जगन्नाथ यांनी अद्याप त्यांच्या आईच्या निधनाबद्दल सार्वजनिक विधान जारी केलेले नाही.

Famous Director Mother Death
Famous Actor Death : प्रसिद्ध अभिनेत्याचे ब्रेन हॅमरेजमुळे निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

पुरी जगन्नाथ आगामी चित्रपट

पुरी जगन्नाथ यांचा लवकरच 'स्लम डॉग 33 टेंपल रोड' हा चित्रपट रिलीज होणार आहे. सध्या या चित्रपटावर ते काम करत आहेत. चित्रपटात विजय सेतुपती मुख्य भूमिकेत आहेत. यात तब्बू, विजय कुमार, ब्रह्माजी आणि व्हीटीव्ही गणेश यांसारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिका आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार हर्षवर्धन रामेश्वर हे संगीत दिले आहे. हा एक ॲक्शन चित्रपट आहे. चित्रपट तेलगू, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदीमध्ये या वर्षी रिलीज होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com