MNS on Pathan Movie: 'पठान'साठी मराठी चित्रपटांचा बळी देऊ नका, मनसेचा आक्रमक पवित्रा

मराठी सिनेमांवर मल्टीप्लेक्स चालकांकडून अन्याय होऊ नये यासाठी मनसे मैदानात उतरली आहे.
MNS on Pathan
MNS on Pathan Saam TV

Pathan Movie Released : शाहरूख खानचा बहुचर्चित पठान सिनेमा आज सगळीकडे प्रदर्शित झाला आहे. सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. मात्र पठान सिनेमामुळे उद्या रिलीज होणाऱ्या दोन मराठी सिनेमांना फटका बसण्याची शक्यता आहे. मराठी सिनेमांवर मल्टीप्लेक्स चालकांकडून अन्याय होऊ नये यासाठी मनसे मैदानात उतरली आहे.

शाहरुख खानचा पठान चित्रपट मोठ्या धुमधडाक्यात प्रदर्शित होत आहे. बॉलिवूडसाठी मोठी घटना वगैरे आहे, शाहरुखचा कमबॅक आहे. शाहरुखच्या पठान सिनेमाला आमचा विरोध नाही, सिनेमाला मोठं यश मिळो. मात्र म्हणून मल्टीप्लेक्सनी ‘बांबू’ आणि ‘पिकोलो’ या चित्रपटांचा बळी देऊ नये, असं अमेय खोपकर यांनी म्हटलं.

MNS on Pathan
King Is Back: शाहरुख- सलमान पुन्हा एकदा दिसणार एकत्र, 'पठान'मधील 'हा' सीन होतोय व्हायरल...

पठानचं भलं करा, पण मराठी चित्रपटांनाही त्यांचा वाटा द्यायला पाहिजे. मल्टीप्लेक्स चालकांनी समंजसपणे वागावं, नाहीतर मग आम्ही येऊन ‘बांबू’ लावूच शकतो, असा इशारा मनसे नेते अमेय खोपकर यांनी आहे.

MNS on Pathan
Shah Rukh Khan: चाहत्यानं शाहरुखला विचारली अपूर्ण इच्छा, किंग खाननं दिलं 'हे' उत्तर...

रितेश-जेनेलियाचा वेड सिनेमा चांगलं प्रदर्शन करत आहे. वाळवीनेही चांगलं कलेक्शन केलं आहे. तरीही पठानमुळे मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन चालकांकडून मराठी सिनेमांना स्क्रीन्स मिळत नाहीयेत. याचा मी निषेध करतो. मात्र मराठी सिनेमांना स्क्रीन्स मिळाले नाही तर महाराष्ट्रभर आंदोलन होईल, असा इशाराही अमेय खोपकर यांनी दिला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com