राखी सावंतप्रमाणेच मिका सिंहचे स्वयंवर, असे असेल शोचे स्वरूप

मिका सिंह एका रिअ‍ॅलिटी शोच्या माध्यमातून आपला जोडीदार शोधण्याच्या तयारीत आहे.
Mika Singh
Mika SinghSaam Tv
Published On

मुंबई - मिका सिंह (Mika Singh) नेहमीच विविध कारणामुळे चर्चेत असतो. या अगोदर मिका सिंह हा राखी सावंतला किस केल्यामुळे प्रचंड चर्चेत होता. मात्र, आता परत एकदा मिका सिंह चर्चेत आला आहे, परंतू यावेळी मिका सिंहचे चर्चेत येण्याची कारण वेगळेच आहे. रतन राजपूत, राहुल महान, राखी सावंत (Rakhi Sawant), मल्लिका शेरावत या सारख्या सेलिब्रेटींनी नॅशनल टेलिव्हिजनवर स्वयंवर केल्यानंतर आता मिका सिंह देखील एका रिअ‍ॅलिटी शोच्या माध्यमातून आपला जोडीदार शोधण्याच्या तयारीत आहे.

हे देखील पहा -

44 वर्षीय मिका सिंग या शोमध्ये लग्न करणार नसला तरी तो स्वयंवरच्या फॉर्मेटमध्ये जोडीदाराच्या शोधात असेल. तसेच तो फक्त एंगेजमेंट करेल आणि त्यानंतर तो पुढे काही दिवसांनी लग्न करणार अशी माहिती देखील समोर आली आहे.

Mika Singh
बुलढाण्यात स्वाभिमानीने भरविला शेतकरी शेतमजूरांचा रणसंग्राम मेळावा...

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'हा रिअ‍ॅलिटी शो एखाद्या स्वयंवर शोसारखा असेल. हा शो काही महिन्यांत प्रसारित करण्याची योजना आहे. मीका या शोचा भाग होण्यासाठी खूप उत्सुक आहे. या शोमध्ये देशभरातील स्पर्धक सहभागी होणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com