Marathwada Mukti Sangram: आशियाई चित्रपट महोत्सवात मराठवाड्याचा मुक्तिसंग्राम पाहायला मिळणार, मुंबईत होणार खास स्क्रिनिंग...

Marathwada Mukti Sangram Documentary: या नाट्य माहितीपटामध्ये निझामाच्या क्रूर रझाकारांपासून मराठवाड्याच्या मुक्तिसाठी लढा देणाऱ्या शूरवीर स्वातंत्र्ययोद्ध्यांच्या धगधगत्या संघर्षाबरोबरच मराठवाड्याच्या मातीचा झळाळता गौरवास्पद इतिहास मांडण्यात आला आहे.
marathwada mukti sangram documentary
marathwada mukti sangram documentarySaam Tv
Published On

Maharashtra Government:

सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाची निर्मिती असलेला मराठवाड्याचा मुक्तिसंग्राम हा नाट्य माहितीपट (Marathwada Mukti Sangram Documentary) आशियाई चित्रपट महोत्सवात (Asian Film Festival ) सादर केला जाणार आहे. या नाट्य माहितीपटामध्ये निझामाच्या क्रूर रझाकारांपासून मराठवाड्याच्या मुक्तिसाठी लढा देणाऱ्या शूरवीर स्वातंत्र्ययोद्ध्यांच्या धगधगत्या संघर्षाबरोबरच मराठवाड्याच्या मातीचा झळाळता गौरवास्पद इतिहास मांडण्यात आला आहे.

या नाट्य माहितीपटाचे खास स्क्रिनिंग १३ जानेवारीला म्हणजे शनिवारी दुपारी १२ वाजता माहिम येथील सिटीलाईट सिनेमा येथे करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने मराठवाड्याचा मुक्तिसंग्राम प्रथमच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या 'मुक्तिसंग्राम: कथा मराठवाड्याच्या संघर्षाची' या नाट्य माहितीपटाची निर्मिती सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने केली आहे.

marathwada mukti sangram documentary
Neetu Kapoor: 'ते नेहमीच म्हणायचे हे करू नको...', ऋषी कपूर यांच्याबाबत पत्नी नीतू यांनी केला धक्कादायक खुलासा

'मुक्तिसंग्राम: कथा मराठवाड्याच्या संघर्षाची' या नाट्य माहितीपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. अजय पुरकर, समीर धर्माधिकारी, आदिनाथ कोठारे, समीर विद्वांस विक्रम गायकवाड, स्मिता शेवाळे हे मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार या माहितीपटात महत्वाच्या भूमिकेत आहेत.

marathwada mukti sangram documentary
Navardev Bsc Agri: शेतकरी एक ब्रॅण्ड म्हणून जन्माला येणारे!, 'नवरदेव - Bsc Agri’चा दमदार ट्रेलर रिलीज

सिलेक्टेड करस्पॉन्डन्स ऑफ सरदार वल्लभभाई पटेल, हैद्राबादचा स्वातंत्र्यसंग्राम आणि मराठवाडा आदी पुस्तकांचा संदर्भ घेत माहितीपटाची संहिता लिहिण्यात आली आहे. राज्याच्या सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास मोठ्या पडद्यावर प्रथमच येत आहे. या नाट्य माहितीपटातून नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, असा विश्वास डॉ. ढाकणे यांनी व्यक्त केला.

marathwada mukti sangram documentary
Maldives VS Lakshadweep: सेलिब्रिटीनंतर आता मालदीववर FWICE ची नाराजी, निर्मात्यांना चित्रपटाचे शूटिंग थांबवण्याचे केले आवाहन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com