Sangeet Devbabhali Natak: मराठी रंगभूमीवरील माईलस्टोन नाटक 'संगीत देवबाभळी'चा लवकरच कोकणदौरा

Sangeet Devbabhali Marathi Natak : प्रसाद कांबळी यांनी २२ डिसेंबर २०१७ रोजी "संगीत देवबाभळी" ची निर्मिती केली. या नाटकाचे लेखक, दिग्दर्शक प्राजक्त देशमुख यांनी केले आहे.
Sangeet Devbabhali Marathi Natak
Sangeet Devbabhali Marathi NatakPR
Published On

Sangeet Devbabhali Natak: मराठी माणूस आणि नाटक यांच एक अजब असं मेतकूट आहे. त्यात तो माणूस कोकणातला, मालवणकडचा असेल तर दुधात साखर! या रंगभूमीवर आतापर्यंत शुध्द मराठी भाषेतून येत असलेली मराठी नाटके रसिक प्रेक्षक चोखंदळपणे पहात होता. पण कोकणात जन्मलेल्या एका मराठी मालवणी भाषिक माणसाने मालवणी बोलीभाषेतून “वस्त्रहरण” हे नवकोर नाटक रंगभूमीवर आणून रंगमंच आणि रसिकांसाठी मनोरंजनाचे आगळेवेगळे नवे दालन उघडे केले. १६ फेब्रुवारी १९८० साली कोकण सुपुत्र मच्छिंद्र कांबळी यांनी "वस्त्रहरण" या नाटकाचा पहिला प्रयोग केला. आणि व्यावसायिक मराठी रंगभूमीवर इतिहास घडला. ' १००% देशी फार्स' या शब्दात ज्येष्ठ साहित्यिक पु.ल. देशपांडे यांनी 'वस्त्रहरण' चे कौतुक केले. “वस्त्रहरण” ची आता ५५५५ व्या प्रयोगाकडे घोडदौड सुरू आहे.

हाच वारसा पुढे चालवत ज्येष्ठ रंगकर्मी मच्छिंद्र कांबळी यांचे सुपुत्र प्रसाद कांबळी यांनी २२ डिसेंबर २०१७ रोजी "संगीत देवबाभळी" ची निर्मिती केली. दिग्गजांनी गौरविलेले, समीक्षकांनी वाखाणलेले आणि सर्वाधिक ४४ पुरस्कार प्राप्त झालेल्या 'संगीत देवबाभळी' ने मराठी रंगभूमीवर अढळ स्थान निर्माण करून हे माईलस्टोन नाटक ठरले. ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी तर '१००% मराठी मातीतलं नाटक' या शब्दात गौरव केला. फोर्ब्स इंडिया या जगप्रसिद्ध मासिकाने दखल घेतलेल्या या नाटकाची आता ५५५ व्या प्रयोगाकडे घोडदौड सुरू आहे.

Sangeet Devbabhali Marathi Natak
Chhaava: 'छावा'च्या ट्रेलरवरून पुणेकर नाराज; मराठा क्रांती मोर्चाकडून आंदोलनाचा इशारा!

या निमित्ताने कोकण आणि गोव्यातील मायबाप रसिक प्रेक्षकांसाठी 'संगीत देवबाभळी' चे प्रयोग सादर होणार आहेत. ४ फेब्रुवारी रोजी रेवंडी-मालवण, ५ फेब्रुवारी सावंतवाडी, ६ फेब्रुवारी कणकवली, ७ फेब्रुवारी रत्नागिरी, ८ फेब्रुवारी गुहागर, ९ फेब्रुवारी चिपळूण, १५ फेब्रुवारी फोंडा आणि १६ फेब्रुवारी पणजी येथे प्रयोग आहेत.

Sangeet Devbabhali Marathi Natak
Urmila Kothare : 'मी पडून नाही राहिले'; अपघातातून वाचल्यानंतर उर्मिला अशी घेते स्वतःची काळजी!

"संगीत देवबाभळी" या नाटकाचे लेखक, दिग्दर्शक प्राजक्त देशमुख असून संगीत आनंद ओक, नेपथ्य प्रदीप मुळ्ये, प्रकाशयोजना प्रफुल्ल दीक्षित यांची आहे. यातील (लखुबाई) मानसी जोशी आणि (आवली) शुभांगी सदावर्ते यांनी साकारली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com