Sindhu Tai's Role Was Voiced By Meghna Erande: ‘अनाथांची माय’ अशी ख्याती असलेल्या जगविख्यात स्व. ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचा जीवनप्रवास प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर पाहता येणार आहे. सिंधुताई यांची ओळख एक थोर समाजसेविका म्हणून सर्वत्र आहेत. चित्रपटानंतर सिंधुताई यांचा जीवनप्रवास प्रेक्षकांना आता मालिकेच्या माध्यमातून पाहता येणार आहे.
‘सिंधुताई माझी माई – गोष्ट चिंधीची’ त्यांना जीवनात करावा लागलेला अनेक अडथळींचा सामना, बालपणीचे काही किस्से असे अनेक मुद्दे आपल्याला या मालिकेतून पाहता येणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला होता. मालिकेत सिंधुताईंची भूमिका कोण साकारणार अद्याप हे तरी गुलदस्त्यात असलं तरी, मालिकेत आवाज कोणत्या अभिनेत्रीने दिलाय, याचा खुलासा झालाय.
‘सिंधुताई माझी माई– गोष्ट चिंधीची’ ही मालिका येत्या १५ ऑगस्टपासून कलर्स मराठी या वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मालिकेत सिंधुताईंची भूमिका कोण साकारणार आहे, हे अद्याप गुलदस्त्यात असले तरी या भूमिकेला आवाज कोणी दिलाय, त्या व्यक्तीचे नाव समोर आले आहे. मालिकेतील सिंधुताईंच्या पात्राला आवाज अभिनेत्री आणि डबिंग आर्टिस्ट मेघना एरंडेने आवाज दिल्याचे समोर आले आहे. अभिनेत्रीने आता पर्यंत अनेक पात्रांना आवाज दिला असून तिचा आवाज हा जगभरात प्रसिद्ध आहे.
मेघना एरंडेने आतापर्यंत कार्टून्ससाठी, अनेक भूमिकेसाठी आवाज, नॅशनल जॉग्रफिकमधील कार्यक्रमामध्ये आवाज अशा अनेक ठिकाणी तिने आवाज दिले आहे. मेघनाने या मालिकेत सिंधुताईंच्या पात्राला आवाज दिल्याची माहिती तिने स्वत:च सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.
यावेळी अभिनेत्री तिच्या पोस्टमध्ये म्हणते, “माझं अहो भाग्य की मला माननीय पद्मश्री सिंधुताई ह्यांना डब करण्याची सुवर्ण संधी मिळाली. सिंधुताई सपकाळ या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्या विशेषतः भारतातील अनाथ मुलांचे संगोपन करण्याच्या कार्यासाठी ओळखल्या जातात. त्यांना २०२१ मध्ये सामाजिक कार्य श्रेणीत पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अडथळ्यांची शर्यत चिंधीने प्रेमाने जिंकली, अनाथ लेकरांची आई “सिंधुताई” झाली..”
‘सिंधुताई माझी आई- गोष्ट चिंधीची’ या मालिकेमध्ये सिंधुताईंची भूमिका कोणती अभिनेत्री साकारणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. यापूर्वी स्व. ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपटात सिंधुताईंची भूमिका अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने साकारली होती.
‘सिंधुताई माझी आई- गोष्ट चिंधीची’ मालिकेमध्ये प्रेक्षकांना सिंधुताईंच्या बालपणातील किस्से, त्यांना जीवनात करावा लागलेला संघर्ष आणि असे अनेक मुद्दे आपल्याला या मालिकेतून पाहता येणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.