Manipur Clashes Celebrity reaction Over Manipur women's Paraded Video: मणिपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून अशांतता आहे. मणिपूर राज्यात हिंसाचाराच्या घटना सुरूच असताना गुरूवारी माणुसकीला काळीमा फासणारा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मणिपूर राज्यात काही दिवसांपासून तणाव अधिकच वाढला आहे. एका जमावानं दोन महिलांना निर्वस्त्र करून रस्त्यावरून त्यांना फिरवलं. त्यांच्यावर भर रस्त्यात विनयभंगही करण्यात आला.
गुरूवारपासून तो व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत असून त्या घटनेवर सर्वच स्तरातून संतप्त अशा प्रतिक्रिया येत आहेत. अशातच काही बॉलिवूड सेलिब्रिटींप्रमाणे मराठी सेलिब्रिटींनीही प्रतिक्रिया दिली आहे.
मणिपूरमधील हिंसाचाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अभिनेता कुशल बद्रिकेने महाभारतासोबत संबंध जोडत या घटनेचा निषेध केलाय. कुशलने तिथल्या परिस्थितीवर संताप व्यक्त करत इंस्टाग्राम पोस्ट लिहिली आहे.
कुशल म्हणतो, ‘कौरवांनी द्रौपदीचे कपडे काढले खरे पण लाज निघाली ती पांडवांची... ध्रुतराष्ट्राच्या नजरेने भरलेल्या ह्या समाजाचा मी सुद्धा एक हिस्सा आहे, ह्याची मला प्रचंड किव येते. मी हात जोडून वाट बघतोय श्री कृष्णाची आता त्याने अवतरण्याची गरज आहे. मी निषेध करतो मणिपुर घटनेचा...’
कुशलच्या आधी काही मराठी सेलिब्रिटींनीही या घटनेवर स्वत:चे मत मांडले आहे. याआधी स्वप्नील जोशी, हेमंत ढोमे, सलील कुलकर्णी, रेणुका शहाणे, हेमांगी कवी, अभिज्ञा भावे या मराठी सेलिब्रिटींनी मणिपूर घटनेसंदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून संतप्त प्रतिक्रिया दिल्या होत्या. कुशलच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाईक्सचा देखील वर्षाव केला आहे. सध्या अभिनेत्याची पोस्ट कमालीची चर्चा आली आहे.
कुशलबद्दल बोलायचे तर, अभिनेता नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो अनेकदा वेगवेगळ्या घटनांवर तो आपले स्पष्ट मत मांडत असतो. त्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, कुशल गेल्या काही दिवसांपूर्वी ‘रावरंभा’ (Ravrambha) या ऐतिहासिक चित्रपटात कुशल क्रूरकर्मा ‘कुरबतखान’ ही भूमिका साकारलीय. विनोदी भूमिका साकारताना महाराष्ट्रातील ‘कॉमेडीयन’ म्हणून स्थान मिळवलेल्या कुशलची ही पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका आहे. यामध्ये त्याने नकारात्मक भूमिका साकारली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.