
मुंबई: जियो स्टुडिओज (Jio Studios) निर्मित 'गोदावरी' चित्रपटाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठी सिनेमांची (Cinema) मोहोर उमटवली आहे. चित्रपटाने केवळ देशातच नाहीतर आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपले नाव कोरले आहे (National Awards) (International Awards). इफ्फी महोत्सव,न्युयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल, वनकोवर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, न्युझीलंड फिल्म फेस्टिव्हल, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, एफआयपीआरईएससीआय- इंडिया ग्रॅंड प्रिक्स अशा अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चित्रपटाने मानाचा तुरा रोवला आहे. (Marathi Movie)
बहुचर्चित 'गोदावरी' चित्रपट अखेर प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. येत्या ११ नोव्हेंबरपासून चित्रपट मराठी रसिकजनांच्या मनावर अधिराज्य गाजवायला येत आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. चित्रपटात अभिनयात दमदार असलेल्या कलाकारांची फौज आहे. जितेंद्र जोशी, नीना कुळकर्णी, संजय मोने, प्रियदर्शन जाधव, गौरी नलावडे हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसत आहेत. (Marathi Actor) (Marathi Actress)
कौटुंबिक विषयावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या टिझरमध्ये जितेंद्र जोशी आणि त्याच्या कुटुंबाच्या नात्यांतील चढउतार, परंपरा आणि भावनांचे उत्तम मिश्रण दिसत आहे. गोदावरी नदीचे आणि चित्रपटातील परिवाराचे नक्की कोणते घनिष्ठ संबंध आहेत हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल.
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक म्हणतात, ''कुटुंबाने एकत्र पाहावा असा हा चित्रपट आहे. आयुष्यात एखादी गोष्ट साध्य करताना अनेक गोष्टी, नाती मागे राहतात. नात्याचे मूल्य सांगणारा, नात्यांची नव्याने ओळख करून देणारा हा कौटुंबिक चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.''
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.