बाई गं...'चंद्रमुखी'त लावणीचा ठसका, नृत्याची बिजली कडाडली

या गाण्यात अजय-अतुलचं संगीत आणि अमृता खानविलकरचा नृत्यअविष्कार पाहिला मिळणार आहे.
Chandramukhi
Chandramukhi Saam Tv
Published On: 

मुंबई - प्रसाद ओक (Prasad Oak) दिग्दर्शित चंद्रमुखी हा चित्रपट येत्या 29 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चंद्रमुखी कोण असणार, याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली होती. मात्र काही दिवसांपूर्वी एका चंद्रा प्रेक्षकांसमोर आली. यावेळी आपल्या मोहमयी नजाकतीने या लावण्यवतीने सर्वांचीच मने जिंकली आणि याला साथ लाभली ती अजय -अतुल यांच्या दमदार संगीताची. चंद्रमुखी चित्रपटाच्या प्रत्येक गाण्याला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. त्यातचं आता या चित्रपटच आणखी एक नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याचं नाव बाई गं... असे आहे. या गाण्यात अजय-अतुलचं संगीत आणि अमृता खानविलकरचा नृत्यअविष्कार पाहिला मिळणार आहे.

बाई गं या गाण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. या चित्रपटात अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 'चंद्रमुखी' या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले आहे. तर चिन्मय मांडलेकर यांचे पटकथा-संवाद आहेत. या चित्रपटाला अजय -अतुल यांचे जबरदस्त संगीत लाभले आहे. विश्वास पाटील यांच्या 'चंद्रमुखी' या कादंबरीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.