Hemangi Kavi: ‘पुरूष सदस्यांनो माझी पोस्ट वाचाल तर तुमचा रविवार...’; हेमांगीने दिला मोलाचा सल्ला

नेहमीच परखड मत मांडणारी हेमांगी आता सुद्धा एका सोशल मीडिया पोस्टवरून चर्चेत आली आहे.
Hemangi Kavi Post
Hemangi Kavi PostFacebook Post

Hemangi Kavi Post: मराठी सिनेसृष्टीत नेहमीच आघाडीची समजली जाणारी हेमांगी कवी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. हेमांगी आपल्या अभिनयामुळे मराठी मनोरंजन विश्वातील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून संबोधले जाते. अनेक मालिका, चित्रपट, नाटकात तिने आपल्या अभिनयातून सिनेसृष्टीत छाप सोडली. अभिनयासोबतच हेमांगी नेहमीच आपल्या सोशल मीडिया पोस्टवरून चर्चेत असते. नेहमीच परखड मत मांडणारी हेमांगी आता सुद्धा एका सोशल मीडिया पोस्टवरून चर्चेत आली आहे.

Hemangi Kavi Post
Rakshita Suresh Accident: 'पोन्नियन सेल्वन 2' मधील गायिकेचा भीषण अपघात; कार डिव्हायडरला धडकली अन् १० सेकंदातच...

परखड आणि रोखठोक मुद्दा मांडणाऱ्या हेमांगीने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. नेहमीच विविध विषय निवडणाऱ्या हेमांगीने यंदा चक्क कपडे आणि फॅशन हा विषय निवडलाय. नेहमीच महिलांना आणि मुलींना फॅशनची फार आवड असते. नेहमीच कपड्यांवरून वाद होत असल्यामुळे यावेळी हेमांगीने पुरूषांना एक सल्ला दिला. सोशल मीडियावर हेमांगीने पोस्ट शेअर करत यावेळी तिचा स्वतःचा अनुभव देत पुरुषांना एक मोलाचा सल्लाही दिला आहे. (Marathi Actress)

फेसबूकवर पोस्ट करत हेमांगी आपल्या चाहत्यांना म्हणते, ''जेव्हा तुम्हाला फारसे कपडे खरेदी करावेसे वाटणार नाही तेव्हा तुम्ही समजूतदार झाले आहात असं समजायचं. हे विधान थोडं विचित्र आहे पण खरंय! मी २०२० आणि २०२१ पुर्ण २ वर्ष कपड्यांचं बिलकुल शॉपिंग केलं नाही. एकतर लॉकडाउन चालू होता, दुसरं म्हणजे त्याच काळात उमगलं की कपड्यांवर खुपच खर्च होतो आणि तिसरं म्हणजे माझ्यात फार मोठे शारीरिक बदल होत नसल्यामुळे कपड्यांचा ढीग साचतोय आणि कपाट कमी पडतंय.''

''माझ्याकडे १५-२० वर्षांपासूनचे कपडे अजूनही चांगल्या condition मध्ये आहेत आणि मी ते वापरते. काही माझ्या भाच्यांना देते. काही mix match करत वापरते. आता इतकी वर्ष हे कपडे टिकतात कसे तर एक म्हणजे कपडे नीट वापरायची, जपून धुवायची शिस्त आणि दुसरं म्हणजे या कला क्षेत्रात काम केल्याच्या अनेक फायद्यांमध्ये शूटिंग सेट, नाटकातले कपडे दिवसभर घातल्यामुळे आमच्या वैयक्तिक कपड्यांचा कमीत कमी वापर.''

पुढे हेमांगी म्हणते, ''पण आता तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करत असलात (खासकरून महीलांसाठी) तरी सोशल मीडिया मुळे एकदा का एका आऊट फिट वर तुम्ही एखादा फोटो पोस्ट केला की झालं परत तो वापरायचा नाही असा एक अलिखित नियम रूढ होतोय. आणि मी या नियमातून स्वतःला मुक्त केलंय. मी कपडे रिपीट करते. त्यावरचे फोटोही पोस्ट करते. बिनधास्त.''

''काही आगाऊ लोकं कमेंट मध्ये त्यांच्या बारीक निरीक्षणाची आणि बेरकी स्वभावाची पावती देतात पण त्याने मला फरक पडत नाही. आता मी ४-५ महीन्यातून एकदा खरेदी करते. खरंच खुप बरं वाटतं. हलकं वाटतं.''

Hemangi Kavi Post
The Kerala Story Collection Day 2: प्रचंड विरोधानंतर ‘द केरला स्टोरी’ केले दुसऱ्या दिवशी धमाकेदार कलेक्शन…

''या post मधून देशा समोर उभे असलेले प्रॉब्लेम सोल्व होणार नाहीएत किंवा या माझ्या आत्मज्ञानाने तुम्हांला काही एक फायदा होणार नाहीए हे मला माहितीए पण मला शेयर करावंसं वाटलं म्हणून केलं. आता मला ती maturity गाठायची आहे जेव्हा हे असलं काही शेयर करणं ही निरर्थक वाटू लागेल!''

''एवढेच नाही तर तिने पुरुषांसाठी एक तळटीप दिली आहे. हेमांगी म्हणते, ''मंडळातील पुरूष सदस्यांनी लगेच आपल्या नात्यातल्या, ओळखीतल्या, घरातल्या, बाहेरच्या, ऑनलाइनच्या, ऑफलाइनच्या स्रियांना ‘शॉपिंग कसं करू नये’ याचं उत्तम उदाहरण म्हणून ही पोस्ट वाचून दाखवू किंवा पाठवू नये अन्यथा तुमचा रविवार खराब होण्याची शक्यता उद्भवेल!'' असं म्हणत तिने पोस्ट शेअर केली आहे. (Marathi Film)

Hemangi Kavi Post
Jawan Release Date Out: शाहरुख खानच्या 'जवान'चे नवीन पोस्टर प्रदर्शित; सप्टेंबरमध्ये होणार धमाका

हेमांगीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, सध्या ती 'लेक माझी दुर्गा' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गेल्या वर्षी हेमांगीने दोन चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली होती. पण आता प्रेक्षकांनाही तिच्या आगामी चित्रपटाची चाहूल लागली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com