Tejaswini Pandit Post: "१८ वर्ष जिद्द आणि चिकाटीची....", मनसेच्या वर्धापनदिनानिमित्त तेजस्विनी पंडितची खास पोस्ट

Tejaswini Pandit News: आज मनसेचा १८ वा वर्धापन दिन आहे. अभिनेत्रीने नुकताच इन्स्टाग्रामवर मनसेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत एक इन्स्टा स्टोरी शेअर केलेली आहे.
Tejaswini Pandit Special Post For Raj Thackeray
Tejaswini Pandit Special Post For Raj ThackerayInstagram
Published On

Tejaswini Pandit Special Post Raj Thackeray

प्रसिद्ध अभिनेत्री आणि निर्माती तेजस्विनी पंडितने आपल्या चाहत्यांचे फक्त चित्रपटातूनच नाही तर वेबसीरिज, मालिका आणि नाटकांतूनही निखळ मनोरंजन केले आहे. तेजस्विनी अनेकदा सोशल मीडियावर रोखठोक वक्तव्य आणि राजकारणावर आपलं परखड मत मांडत असते.

अनेकदा तेजस्विनीने सोशल मीडियावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ सोशल मीडिया पोस्ट लिहिली आहे. आज मनसेचा १८ वा वर्धापन दिन आहे. अभिनेत्रीने नुकताच इन्स्टाग्रामवर मनसेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत एक इन्स्टा स्टोरी शेअर केलेली आहे.

Tejaswini Pandit Special Post For Raj Thackeray
Devadhi Dev Song: देवेंद्र फडणवीस-अमृता फडणवीसांचं नवं गाणं आलं! VIDEO

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १८ वा वर्धापन दिन आहे. या दिवसाचे खास औचित्य साधत तेजस्विनीने नुकतीच एक इन्स्टा स्टोरी शेअर केली आहे. शेअर केलेल्या स्टोरीमध्ये, तेजस्विनीने राज ठाकरेंचा एक जुना फोटो शेअर करत त्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, इन्स्टा स्टोरीमध्ये तेजस्विनी पंडित म्हणते, "१८ वर्ष जिद्द आणि चिकाटीची... पुढील वाटचालीस नेहमीप्रमाणे शुभेच्छा." तेजस्विनीने खास राज ठाकरेंसाठी शेअर केलेल्या इन्स्टा स्टोरीची नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.

tejaswini pandit shared post for raj thackeray mns vardhapan din
tejaswini pandit shared post for raj thackeray mns vardhapan dinInstagram

अनेकदा तेजस्विनीने राज ठाकरे यांच्या वक्तव्यांचे व्हिडीओ इन्स्टास्टोरीवर शेअर केल्या आहेत. मध्यंतरी प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला, महाराष्ट्रातल्या परिस्थितीबद्दल, टोल मुद्द्यांवरून सह अनेकदा तिने राजकीय परिस्थितीबद्दल उघडपणे भाष्य केलं..

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com