Marathi Cinema : मल्टिप्लेक्समध्ये मराठी सिनेमा परवडत नाही, शंभर रुपयात तिकीट उपलब्ध करून द्या; अभिनेत्याची मोठी मागणी
मकरंद अनासपुरे यांनी मराठी सिनेमाच्या सद्यस्थितीवर भाष्य.
मल्टिप्लेक्समध्ये मराठी सिनेमाचे तिकीट १०० रुपयात उपलब्ध व्हावे, अशी मागणी.
पुण्यात एका सांस्कृतिक विभागाच्या कार्यक्रमात अनासपुरे यांची उपस्थिती.
सागर आव्हाड, साम टीव्ही, प्रतिनिधी
Makarand Anaspure News : पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विशेष उपस्थिती लावली होती. याशिवाय अभिनेते मकरंद अनासपुरे, अभिनेते महेश नलावडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये मकरंद अनासपुरे यांनी मराठी सिनेमा आणि मनोरंजनसृष्टीवर भाष्य केले.
'मल्टिप्लेक्समध्ये मराठी सिनेमा परवडत नाही. यासाठी राज्यकर्त्यांनी प्रयत्न केले पाहिजे. शंभर रुपयात मराठी सिनेमा पाहता येईल का याची सुविधा राज्यभरात उपलब्ध करुन दिली पाहिजे. असे केल्याने मराठी सिनेमाला चांगले दिवस येतील', असे वक्तव्य मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी पुण्यातील कार्यक्रमात केले.
'जेव्हा सलग दोन ते तीन सुट्ट्या लागून येतात, तेव्हा हिंदी सिनेमा, बॉलिवूडचा सिनेमा, हॉलिवूडचा सिनेमा प्रदर्शित होतो. यामुळे मराठी सिनेमांना सिनेमागृहात जागा मिळत नाही. ही वस्तुस्थिती आहे. जर जागा दिली, तर चुकीची वेळ दिली जाते. सकाळी नऊ वाजताचा शो, रात्री दहा वाजताचा शो असं जेव्हा साधारण प्रेक्षक जात नाही. यामुळे मराठी सिनेमाची ही दैन्यवस्था कशी संपणार?' असा सवाल मकरंद अनासपुरे यांनी विचारला आहे.
मकरंद अनासपुरे म्हणाले, 'दाक्षिणात्य भूमीमध्ये जर आपण पाहिलं, तर कर्नाटक सरकारने दोनशे रुपये मल्टिप्लेक्ससाठी ठेवले आहेत. असंच आपल्याकडेही करता येईल. स्पर्धेच्या लेव्हवर जर तीनशे साडेतीनशे डायरेक्टर असतील आणि यातले समजा काहीच डायरेक्टर पुढे भविष्यात डायरेक्टर झाले, तर त्यांनी सिनेमांचं करायचं काय? त्यांच्या सिनेमांनी करायचं काय? हा मूळ प्रश्न आहे.'
'नवीन मुलं काहीतरी चांगलं म्हणून इच्छित आहेत, काहीतरी मांडू इच्छेत आहेत आणि दरवर्षी राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी सिनेमा ज्या पद्धतीने आपली मोहर उमटवतोय ती आपल्याला सगळ्यांना अभिमानाची आणि आनंदाची मी बाब आहे आणि अगदी पुढच्या आठवड्यात तो साबरबोंड सिनेमा जो आंतरराष्ट्रीय सिनेमांमध्ये सर्वोत्कृष्ट तोही सिनेमा आपल्या सगळ्यांसमोर येईल तर मला असं वाटतं की या सर्व तरुणांना एक चांगला मंच मिळावा यासाठीची धडपड आपण करायला हवी', असे अनासपुरे यांनी म्हटले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.