Priyadarshini Indalkar Post: विमान रद्द अन् अमेरिकेतील धावपळ... ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्रीने शेअर केला परदेशातील 'तो' अनुभव

Maharashtrachi Hasyajatra Fame Actress: अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरने अमेरिकेतील एक धावपळीचा एक ब्लॉग शेअर केला आहे.
Priyadarshini Indalkar Post
Priyadarshini Indalkar PostSaam Tv
Published On: 

Priyadarshini Indalkar News: महाराष्ट्राची जनता सध्या लोकप्रिय शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाला फारच मिस करत आहेत. या कार्यक्रमातील सर्वच सेलिब्रिटी नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत राहतात. शोमधील कलाकारांचे चाहते हे फक्त एकट्या महाराष्ट्रातच नाही तर, अवघ्या देशभरात चाहते आहेत. सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची टीम परदेशात आहे.

सध्या सोशल मीडियावर त्यांचे अमेरिका दौऱ्यातील अनेक फोटोज आणि व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत. अशातच शोमधील अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर हिने एक ब्लॉग शेअर केला आहे, त्यामध्ये अभिनेत्रीने अमेरिकेतील एक धावपळीचा व्हिडिओ शेअर केला आहे.

Priyadarshini Indalkar Post
Shreeleela Replace Rashmika Mandanna : एकेकाळी रश्मिका मंदान्ना होती लकी चार्म, तिलाच प्रोजेक्टमधून हटवलं; आता तिची जागा घेणारी श्रीलीला कोण?

टेलिव्हिजन अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकतंच प्रियदर्शनीने अमेरिकेतल्या धावपळीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्रीने भली मोठी पोस्ट देखील शेअर केली आहे.

प्रियदर्शनी पोस्टमध्ये म्हणते, “आमची flight cancel झाली. ४ वाजता न्यू जर्सी ला शो होता आणि आम्ही २ वाजेपर्यंत अजून बॉस्टन ला च होतो. हे समजल्यावर लगेच बॉस्टन च्या महाराष्ट्र मंडळाचे लोक airport वर पोचले. आमच्यासाठी by road जाण्याची व्यवस्था करण्यात आली. NJ च्या लोकांना mail पोहोचली की ४ चा शो ७ वाजता सुरु होईल कारण असं असं झालय.”

Priyadarshini Indalkar Post
Devendra Fadanvis In Khupte Tithe Gupte: ‘मध्यरात्री शिवसेनेचे आमदार गायब होतात आणि तुम्ही...’ अवधूतच्या धारदार प्रश्नावर उपमुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्ट उत्तर

आपल्या पुढे पोस्टमध्ये अभिनेत्री म्हणते, “रस्त्यात जेवणासाठी १६ मिनिट थाबुंन आम्ही full स्पीड ने ५ तासांच्या drive साठी निघालो. नेमका traffic ने आम्हाला त्रास दिला. गेल्या गेल्या शो सुरु करता यावा म्हणुन आम्ही गाडीतच मेक अप केला. केस आवरले. प्रेक्षकाना zoom call करुन विनंती केली की अजून काही काळ please कळ सोसा, आम्ही पोहोचतच आहोत.
त्या दिवशी हास्यजत्रेची पुण्याई कळाली. जवळपास ९०० लोक, sold out show, २ तास आमची वाट पाहत होते आणि टाळ्यांच्या गजरात आमचं स्वागत झालं.”

पोस्टच्या शेवटच्या भागात अभिनेत्री म्हणते, “खूप लांबून लोक आले होते आणि सगळे थांबले होते. हास्यजत्रेवरचं हे प्रेम पाहुन आम्ही सगळे भारावुन गेलो होतो. आमच्या संपूर्ण टीम ची आठवण काढली. मी नशिबवान आहे की या teamचा भाग आहे. USA Tour मधल्या NJ च्या शो साठी केलेली धावपळ आणि त्यावरचा प्रतिसाद हा कायम आठवणीत राहील.”

Priyadarshini Indalkar Post
Devendra Fadanvis In Khupte Tithe Gupte: ‘मध्यरात्री शिवसेनेचे आमदार गायब होतात आणि तुम्ही...’ अवधूतच्या धारदार प्रश्नावर उपमुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्ट उत्तर

अभिनेत्रीबद्दल बोलायचे तर, प्रियदर्शनी इंदलकर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. प्रियदर्शनी आपल्या चाहत्यांसोबत नेहमीच खास स्टाईल मधील फोटो शेअर करत असते. तिच्या फोटोंची अनेकदा सोशल मीडियावर देखील तुफान चर्चा असते. प्रियदर्शनी काही दिवसांपूर्वी शाहिद कपूरच्या ‘फर्जी’ या वेबसीरिजमधून देखील प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. सोबतच, अभिनेत्रीने सुबोध भावेसोबत ‘फुलराणी’ या चित्रपटातही प्रमुख भूमिका साकारली होती. सध्या अभिनेत्री अमेरिका दौऱ्याच व्यस्त आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com