Actress Madhuri Pawar: अभिनेत्री माधुरी पवारचा डबल धमाका, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Madhuri Pawar New Show: माधुरी पवार येत्या काही दिवसात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येड लागल प्रेमाच आणि शिट्टी वाजली रे यामधून ती दिसणार आहे.
Madhuri Pawar
Madhuri PawarMadhuri Pawar
Published On

'तुझ्यात जीव रंगला', ‘देवमाणूस’, ‘रानबाजार’, अल्याड पल्याड, लंडन मिसळ या कलाकृतींमुळे अभिनेत्री माधुरी पवार घराघरांत लोकप्रिय झाली. ती उत्तम नृत्यांगणा देखील आहे. नुकतेच तिला दोन मोठे प्रोजेक्ट्स मिळाले आहेत तिने येड लागल प्रेमाच आणि शिट्टी वाजली रे या दोन शोचे प्रोमो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Madhuri Pawar
Bhool Chuk Maaf: 'आज 29 है या 30?'; टाईम लूपमध्ये अडकली राजकुमार राव आणि वामिका गब्बीची अजब लव्हस्टोरी

अभिनेत्री माधुरी पवार तीच्या नव्या प्रोजेक्ट विषयी सांगते, “देणेवाला जब भी देता…देता छप्पर फाडके अशी माझी सध्याची भावना आहे. माझ्याकडे काही चित्रपट व सीरीज असल्या कारणाने मी गेले २ वर्ष टीव्ही मालिका केलेली नाही. मालिकांच आणि माझ जवळच नात आहे. अप्सरा आली हा डान्स रिएलिटी शो जिंकल्यानंतर मी तुझ्यात जीव रंगला तसेच देवमाणूस या सीरियल केल्या. मला मालिका आवडतात. कारण मालिकांमुळे आपण घराघरात दररोज पोहचतो. आपल काम लोकांपर्यंत पोहोचत.”

पुढे ती सांगते, “मी आता दोन्हीकडे शूट करत आहे. स्टार प्रवाह वर येड लागलं प्रेमाच आणि शिट्टी वाजली रे हे शोज मी करत आहे. येड लागलं प्रेमाच या सीरियल मध्ये मी निकी हा नेगेटिव्ह रोल करत आहे. ही भूमिका बिनधास्त, नीडर आणि रावडी आहे. तर शिट्टी वाजली रे या रिएलिटी शोमध्ये धम्माल मस्ती करताना मी तुम्हाला दिसणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट मध्ये मी वेगवेगळ्या भूमिकेत तुमच्या भेटीला येणार आहे. माझा सगळ्या प्रेक्षकांवर विश्वास आहे की तुम्ही हे कार्यक्रम नक्की बघणार. तुमच प्रेम कायम असच राहो हीच सदीच्छा!”

Madhuri Pawar
Bharti Singh : कॉमेडियन भारती सिंह होणार रिटायर; म्हणाली, 'मग मी काम थांबवेन...'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com