Pradeep Patwardhan: मराठी रंगभूमीवर शोककळा; 'मोरूची मावशी' फेम अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन

गिरगाव येथील निवासस्थानी त्यांनी अखेरच्या श्वास घेतला.
Pradeep Patwardhan
Pradeep PatwardhanSaam Tv

मुंबई - मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन (Pradeep Patwardhan) यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने प्रदीप पटवर्धन यांचे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. वयाच्या 65 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. आपल्या गिरगाव येथील निवासस्थानी त्यांनी अखेरच्या श्वास घेतला.

प्रदीप पटवर्धन हे मराठी रंगभूमीवरचे कलाकार आहेत. त्यांनी अनेक नाटकांत, चित्रपटांत आणि मालिकांमध्ये काम केलेले आहे. मोरुची मावशी’ हे त्यांचे रंगभूमीवरील नाटक प्रचंड गाजले. या नाटकामुळे त्यांना मनोरंजन सृष्टीमध्ये एक वेगळीच ओळख मिळाली होती.

हे देखील पाहा -

त्यांनी नवरा माझा नवसाचा, लावू का लाथ अशा चित्रपटांमध्येही भूमिका साकारली होती. त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वाला मोठा धक्का आहे. अनेकांनी आपल्या भावनांना वाट करून देत प्रदीप यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Pradeep Patwardhan
Bacchu Kadu : मंत्रिपद मिळालं नाही तर..., आमदार बच्चू कडू काय म्हणाले? वाचा....

प्रदीप पटवर्धन यांनी एक फुल चार हाफ (१९९१), डान्स पार्टी, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, एक शोध, चस्मे बहाद्दर, गोळा बेरीज, जर्नी प्रेमाची, चष्मे बहाद्दर, गोळा बेरीज, बॉम्बे वेल्वेट. पोलीस लाईन, व टू थ्री फोर, जर्नी प्रेमाची, परिस, थँक यू विठ्ठला या सारख्या अनेक चित्रपट त्यांनी काम केलं आहे. प्रदीप पटवर्धन यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com