

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) सध्या चर्चेत आले आहेत. अशोक सराफ यांना काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यानंतर आता त्यांना आणखी एक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी संगीत नाटक अकादमीतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाच्या पुरस्कारासाठी अशोक सराफ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. नुकताच त्यांना राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. अशोक सराफ यांच्या पत्नी आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत याबाबत आनंद व्यक्त केलाय.
नुकताच दिल्लीतील विज्ञान भवनामध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक सराफ यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. अशोक सराफ यांचा हा पुरस्कार स्वीकारतानाचा व्हिडीओ निवेदिता सराफ सराफ यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. हा व्हिडीओ शेअर करत निवेदिता सराफ यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'खूप खूप अभिमान वाटला अशोक यांना हा पुरस्कार स्वीकारताना पाहून. आम्ही दोघेही महाराष्ट्रातील जनतेचे ऋणी आहोत.'
निवेदिता सराफ यांच्या या पोस्टला चाहत्यांनी पसंती दिली आहे. तसंच, कमेंट्स करत चाहत्यांनी अशोक सराफ यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दरम्यान, यंदा संगीत नाटक अकादमीतर्फे विविध क्षेत्रातील ९४ कलाकारांच्या नावाची पुरस्कारासाठी (Sangeet Natak Academy Awards) घोषणा करण्यात आली आहे. शास्त्रीय संगीत, नृत्य, नाटक अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या देशातील कलाकारांना हा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. या पुरस्कारासाठी नावं जाहिर झालेल्या सर्वांना आज राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या पुरस्कार सोहळ्यादरम्यान भाषण करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितले की, 'देशातील कलाकार आपली भारतीय कला आणखी समृद्ध करत राहतील. कलाकार त्यांच्या कलेतून रुढीवादी प्रवृत्तींना आव्हान देतात. ते आपल्या कलेतून समाजप्रबोधन करतात. आमच्या कला या भारताच्या सॉफ्ट-पॉवरचे सर्वोत्तम उदाहरण आहे. देशातील कलाकार संगीत आणि नाटकाच्या विविध प्रकार आणि शैलींद्वारे भापतीय कला परंपरा समृद्ध करतील.', अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.