
मराठमोळी अभिनेत्री, होस्ट आणि बिझनेसवुमन अशा विविध भूमिका लिलया पार पाडणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ता माळी सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमध्ये होस्टिंग करताना दिसत आहे. या कार्यक्रमाबरोबरच ती सध्या काही चित्रपटांच्या माध्यमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. प्राजक्ता शेवटची 'तीन अडकून सीताराम' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या चित्रपटानंतर अभिनेत्रीचा २०२४ मधल्या नव्या चित्रपटाचा पुण्यामध्ये मुहूर्त पार पडला. (Marathi Actress)
मालिका, वेबसीरीज आणि चित्रपट या तीनही माध्यमांतून प्राजक्ता चाहत्यांचे निखळ मनोरंजन करीत असते. प्राजक्ताचा गेल्या काही दिवसांपूर्वी 'तीन अडकून सीताराम' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटानंतर प्राजक्ता 'भिशी मित्र मंडळ' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच अभिनेत्रीने आपल्या आगामी चित्रपटाबद्दलची पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. प्राजक्ता कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. ती कायमच इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आपल्या चित्रपटांबद्दल, बिझनेसबद्दल किंवा तिच्या पर्सनल लाईफबद्दल अनेक माहिती चाहत्यांसोबत शेअर करत असते. (Marathi Film)
नुकतंच प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर चित्रपटाच्या मुहूर्त दरम्यानचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शन दिले की, "ह्या वर्षातल्या पुढील चित्रपटाला प्रारंभ; नुकतंच पुण्यामध्ये चित्रपटाचा मुहूर्त पार पडला.. २०२४ हे वर्ष मला खूप बिझी ठेवणार अशी शक्यता आहे. मी पोस्ट कोल्हापूरातून लिहितेय. माझ्या नव्या प्रोजेक्टसाठी मी खूपच उत्सुक आहे." मुहूर्तावेळी प्राजक्तासोबत चित्रपटाचे निर्माते, लेखक, दिग्दर्शकांसह चित्रपटाची संपूर्ण टीमही उपस्थित होती. (Social Media)
चित्रपटाचे कथानक भिशीबद्दल आहे. भिशी म्हणजे, ग्रुपमधील सदस्य प्रत्येक महिन्याला ठराविक पैसे एकत्र करून टप्प्याटप्प्याने सर्व सदस्यांना पैसे वापरायला देतात. साधारणत: प्रत्येक महिन्याला ग्रुपमधील एका सदस्याच्या घरी किंवा त्यांनी ठरवलेल्या एका ठिकाणी जमून, पैसे गोळा करून चिठ्ठी काढून ज्याचे नाव येईल त्याला पैसे दिले जातात.
भिशी हा प्रकार विशेषत: महिला, कामगार आणि व्यापाऱ्यांमध्ये अधिक प्रचलित आहे. धमाल, कॉमेडी आणि निखळ मनोरंजक कथानक असलेल्या या चित्रपटात प्राजक्तासोबत कोणकोणत्या कलाकारांची वर्णी लागणार हे तरी अद्याप गुलदस्त्यातच आहे. अद्याप चित्रपटाबद्दलची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. (Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.