- फिरोज तांबोळी
गोंदवले (जि. सातारा) : 'आकालमुक्ती के लिए कठोर परिश्रम करनेवाला लोधवडे गाव मुझे देखना है। मै उन लोगोसे मिलने जरूर आऊगा' असं वचन देऊन जलसंधारण कामासाठी तब्बल पस्तीस लाखाचा निधी जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांनी लोधवडेकरांना दिला होता. आजारपणामुळे मात्र त्यांची ही भेट अखेर अपूर्णच राहिली. आज (बुधवार) दिलीप कुमार यांच्या निधनाने लोधवडेकरांनी आठवणी जागवल्या. (lodhavade-villagers-recalls-memories-dilip-kumar-satara-trending-news)
दुष्काळी परिस्थिती बदलायचीच असा चंग बांधलेल्या लोधवडे (ता.माण) ग्रामस्थ तत्कालीन सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या मार्गदर्शनाने एकजूटीने प्रयत्न करत होते. जलसंधारणाची ही कामे मोठ्या प्रमाणात सुरू असतानाच अनेक दानशूरांनी याकामी मदत केली होती. यापैकीच एक जेष्ठ अभिनेते दिलीपकुमार होते.
सन २००६-७ मध्ये राज्यसभेचे खासदार असताना दिलीप कुमार आणि सायरा बानाे यांच्याशी श्री देशमुख यांनी भेट झाली होती. यावेळी झालेल्या औपचारिक चर्चेदरम्यान श्री देशमुख यांनी लोधवडेकरांची दुष्काळमुक्तीसाठीची धडपड त्यांच्यासमोर व्यक्त केली होती. सिनेमातील कथानकेला साजेशा ठरेल अशा प्रयत्नांचा अनुभव ऐकून ते प्रभावित झाले होते. त्यांनी तात्काळ कसलाही विचार न करता 'साहब आप के गाव के लिए मै जीतनी चाहो उतनी मदत जरूर दुगा'।असं सांगून आपल्या खासदार फंडातून तब्बल पस्तीस लाख रुपये निधी दिला. यातून गावालगतच्या ओढ्यावर पाच साखळी बंधारे बांधण्यात आले आहेत.
दुष्काळमुक्तीसाठी हे बंधारे खूप मोलाचे ठरल्याने लोधवडेकर उपकृत झाले.हा दिलदार अभिनेता आपल्या गावात भेटायला येणार असल्याने लोक भारावून गेले होते.गावातच होणाऱ्या भेटीची ओढ असतानाच त्यांच्या आजारपणामुळे ही भेट लांबली.अन लांबतच गेली.आज मात्र हा अभिनेता काळाच्या पडद्याआड गेल्याने लोधवडेकरांची भेट अपूर्णच राहिली.
दिलीपकुमार हे महान अभिनेतेच नव्हे तर सहृदयी व्यक्तिमत्व होते.त्यांचे लोधवड्यावर अनंत उपकार असल्याने बंधाऱ्यांच्या रूपाने ते आम्हा सर्वांच्या कायम स्मरणात राहतील अशी भावना माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केली.
दरम्यान खासदार उदयनराजे भाेसले यांनीही अभिनेते दिलीप कुमार यांना आदरांजली वाहिली. उदयनराजेंनी समाज माध्यमातून भारतीय चित्रपटसृष्टीचे महानायक दिलीप कुमार हे अद्भुत क्षमतेचे अभिनेते असतानाच एक संवेदनशील व्यक्ती होते. अभिनयाचे साक्षात विद्यापीठ असणारा एक महान कलाकार काळाच्या पडद्याआड गेला अशी भावना व्यक्त केली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.