Singer Death : संगीत विश्वातील प्रसिद्ध आवाज हरपला; पद्मविभूषण विजेत्या ज्येष्ठ गायिकेचे निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

Singer Passed Away : प्रसिद्ध लोकगायकाचे निधन झाले आहे. वयाच्या ७० व्या वर्षी अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला.
Singer Passed Away
Singer Death saam tv
Published On
Summary

संगीत विश्वावर शोककळा पसरली

प्रसिद्ध लोकगायकाचे वयाच्या ७० व्या वर्षी निधन

गायिका पद्मविभूषण पुरस्कार विजेत्या होत्या

संगीत विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध लोकगायकाचे निधन झाले आहे.पद्मविभूषण विजेत्या तीजन बाई (Teejan Bai) यांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. ज्येष्ठ गायिकेच्या निधनाची बातमी समजताच राजकीय, कलाक्षेत्र, संगीतविश्व, मनोरंजन क्षेत्रातील लोकांनी त्यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.

'पीटीआय'च्या (PTI) वृत्तानुसार, पांडवाणी या लोककलेच्या दिग्गज कलाकार असलेल्या तीजन बाई यांचे दीर्घ आजारानंतर वयाच्या ७० व्या वर्षी निधन झाले. रायपूर येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या तिथे गेल्या काही आठवड्यांपासून उपचार घेत होत्या. आज पहाटे ३:१५ च्या सुमारास त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचे निधन झाले.

तीजन बाई कोण होत्या?

छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील गनियारी गावात १९५६ मध्ये जन्मलेल्या तीजन बाई यांनी आपले संपूर्ण आयुष्य 'पांडवाणी' या महाभारतावर आधारित पारंपरिक कथा-सादरीकरण आणि कलेच्या जतनासाठी समर्पित केले. भारत सरकारने तीजन बाई यांना १९८८ मध्ये 'पद्मश्री' आणि त्यानंतर १९९५ मध्ये 'संगीत नाटक अकादमी पुरस्कार' देऊन गौरव केला.त्यांना २००३ मध्ये 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याच वर्षी त्यांना बिलासपूर विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टर ऑफ लेटर्स' (डी. लिट.) ही पदवीही प्रदान करण्यात आली.

ज्येष्ठ लोकगायिका तीजन बाई यांना २०१६ मध्ये 'एम. एस. सुब्बुलक्ष्मी शताब्दी पुरस्कार', २०१८ मध्ये प्रतिष्ठित 'फुकुओका पुरस्कार' आणि २०१९ मध्ये भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला 'पद्मविभूषण' पुरस्कार मिळाला. त्यांनी आपल्या आवाजाने जगाला वेड लावले. तीजन बाई यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Singer Passed Away
Famous Actress Divorce : प्रसिद्ध अभिनेत्रीचा संसार मोडला, लग्नाच्या ५ वर्षांनी घेतला घटस्फोट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com