Ashish Patil: लावणीकिंग आशिष पाटीलवर फसवणुकीचा गुन्हा दाखल; काय आहे नेमकं प्रकरण ?

Ashish Patil : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या नृत्य कौशल्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लावणीकिंग आशिष पाटील याच्यावर फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ashish patil.
ashish patilGoogle
Published On

Ashish Patil : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या नृत्य कौशल्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लावणीकिंग आशिष पाटील याच्यावर फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण कलमे यांनी आशिष पाटील यांच्यावर सांस्कृतिक शोचे नाव आणि संकल्पनेची चोरी करून तो स्वतःचा शो म्हणून बनविल्याचा आरोप केला आहे.

मिळालेल्या माहितीच्या सुत्रांनुसार, प्रवीण कलमे यांनी ऑक्टोबर २०२४ मध्ये 'वर्ल्ड ऑफ स्ट्री' या बहुचर्चित डान्स शोचे आयोजन अमृतकला स्टुडिओच्या सहकार्याने केले होते. या शोचे नृत्यदिग्दर्शन व दिग्दर्शन आशिष पाटीलने केले. या दरम्यान प्रवीण कलमे यांनी लावणी व इतर नृत्यप्रकार एकत्र करून ‘सुंदरी’ नावाच्या लावणी या फ्युजन सांस्कृतिक कार्यक्रमाची संकल्पना आशिष पाटीलच्या समोर मांडली होती.

ashish patil.
Budget 2025: ३०० चित्रपट, लाखो नोकऱ्या, करोडोचे उत्पन्न; तरीही बजेटमध्ये का केले जाते बॉलिवूडकडे दुर्लक्ष?

२९ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रवीण कलमे यांनी ‘सुंदरी’ नावाचा ट्रेडमार्क मनोरंजन सेवांच्या नोंदणीसाठी अर्ज करून आवश्यक शुल्क भरले होते. मात्र, जानेवारी २०२५ मध्ये त्यांना धक्का बसला, जेव्हा आशिष पाटील यांनी ‘सुंदरी: लावणीचा इतिहास’ या नावाने सांस्कृतिक कार्यक्रम ६ फेब्रुवारी २०२५ रोजी नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रात आयोजित केला असल्याचे समजले.

ashish patil.
ranveer singh and shahid kapoor: रणवीर सिंगच्या 'त्या' वक्तव्यावर शाहिद कपूर नाराज; म्हणाला,'बाहेरचा व्यक्ती असल्यासारखे...'

प्रवीण कलमे यांचा दावा आहे. की ‘सुंदरी’ या नावाचा ट्रेडमार्क आणि संकल्पना त्यांची असून आशिष पाटीलने ती चोरून स्वतःच्या नावावर बनवून नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) येथे ०६ फेब्रुवारी २०२५ रोजी सादर करीत आहे आणि सदर कार्यक्रम ट्रेडमार्क कायद्याचे उल्लंघन करते. परिणामी, याबाबत प्रवीण कलमे यांनी मुंबई उच्च न्यायालयात ट्रेडमार्क कायद्याचे उल्लंघन केल्याबाबत वाणिज्यिक बौद्धिक संपदा (Commercial IP Suit) न्यायालयीन केस दाखल केली आहे, तसेच अंतिम निर्णयापूर्वी पुढील नुकसान टाळण्यासाठी तात्कालिक मदतीसाठी अर्ज केला आहे.

प्रविण नारायण कलमे ‘अर्थ’ (जी युनाइटेड नेशन्स मान्यताप्राप्त संस्था आहे) या नफारहित संस्थेचे अध्यक्ष आहेत. सदर संस्था संयुक्त राष्ट्र महासंघाचे SDG ५ (Gender Equality), ८, ११ आणि १६ साध्य करण्यासाठी सक्रियपणे कार्य करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com