गेल्या काही वर्षांपासून दाक्षिणात्य सिनेमांनी (south Indian movie) सिनेचाहत्यांवर अधिराज्य गाजवलं आहे. बाहुबली, केजीएफ, पुष्पा, आरआरआर या सिनेमांनी कोट्यावधी रुपयांची कमाई करत सिनेविश्वात दबदबा निर्माण केला आहे. २०१८ मध्ये केजीएफचा फर्स्ट चाप्टर प्रदर्शीत झाला अन् सिनेचाहत्यांच्या टाळ्यांनी आणि शिट्यांनी चित्रपटगृह गडगडला. केजीएफ सिनेमाच्या आठवणी जिवंत असतानाच आता केजीएफ चाप्टर २ (KGF chapter 2) सिनेमानंही प्रेक्षकांना वेड लावलं आहे. सुपरस्टार यशचा (Yash) प्रशांत नील दिग्दर्शीत केजीएफ चाप्टर २ प्रदर्शीत झाल्यापासून बड्या सिनेमांचे विक्रम मोडीत काढले आहेत. सिनेमा प्रदर्शीत झाल्यापासून १३ दिवसांनंतर केजीएफने बॉक्स ऑफिसवर (Box Office) ६०० कोटींहून अधिक रुपयांची कमाई केलीय. जगभरात बॉक्स ऑफिसवर सर्वाधीक कमाई करणारा केजीएफ सिनेमा भारतातील चौथा सिनेमा ठरला आहे. आमीर खानच्या (Amir Khan) 'सीक्रेट सुपरस्टार' या सिनेमाच्या संपूर्ण कमाईला केजीएफ २ नं क्रॉस केलं आहे. भारतात तेराव्या दिवशी तब्बल १४.५० कोटींची कमाई केजीएफ २ नं केली आहे.
देशभरात 'केजीएफ २' सिनेमाची ६६० कोटींची कमाई
'केजीएफ २' या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून तेरा दिवसांतच तब्बल ६६०.५० कोटींची कमाई केलीय. एकूण कमाईच्या ५० टक्के रक्कम ही केजीएफच्या हिंदी व्हर्जननेच जमा केली आहे. दरम्यान, शुक्रवारी दोन नवे हिंदी सिनेमा प्रदर्शीत होणार आहेत. अमिताभ बच्चन आणि अजय देवगण स्टारर 'रनवे ३४' आणि टायगर श्रॉफ आणि तारा सुतारियाचा 'हिरोपंती २' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'बाहुबली २' आणि 'दंगल' सिनेमाचा विक्रम मोडणार ?
जगभरात कोट्यावधी रुपयांचा गल्ला गाठणाऱ्या सिनेमांमध्ये केजीएफ २ चाही समावेश झाला आहे. केजीएफ २ जगभरात सर्वाधीक कमाई करणारा भारतातील चौथा सिनेमा ठरला आहे. त्यामुळे आता तिसऱ्या स्थान पटकावण्याचं केजीएफ सिनेमाचं लक्ष्य असणार आहे. एस एस राजामौली यांच्या आरआरआर सिनेमानं तब्बल ११०० कोटी रुपयांची कमाई करत तिसऱ्या स्थानावर बाजी मारली आहे. ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांचा आरआरआर सिनेमा अजूनही चित्रपटगृहात झळकत असल्याने कमाईचा गल्ला आणखी वाढू शकतो. मात्र, केजीएफच्या बॉक्स ऑफिसच्या कमाईचा वेग पाहिला तर येणाऱ्या पाच-सहा दिवसांत केजीएफ 2 आरआरआर सिनेमाचा विक्रम मोडण्याची शक्यता आहे. आमीर खान स्टारर दंगल सिनेमानं जगभरात २०७० कोटींची कमाई केलीय. तर बाहुबली २ सिनेमानं १७८८ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे आगामी काळात केजीएफ २ सिनेमा या दोन्ही सिनेमांचा विक्रम मोडणार का ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
'KGF 2' बनवण्याचा प्लॅन नव्हता
सिनेमाचे दिग्ददर्शक प्रशांत नील यांनी एका मुलाखती दरम्यान असं म्हटलंय की, केजीएफ ला दोन चाप्टर मध्ये करण्याच विचार केला नव्हता. त्यावेळी बजेटची समस्या होती. परंतु, केजीएफ चाप्टर टू ची वाढत्या मागणीनुसार, आम्ही सिनेमाच्या बजेटचं विचार करणं सोडलं आणि एका मोठ्या स्केलवर ग्रॅंड कॅनवासवर सिनेमा बनवण्याचं ठरवलं. या सिनेमाला हॉलिवूड सिनेमाचा दर्जा मिळण्यासाठी आम्ही सर्वांनी काबाडकष्ट केले. केजीएफ चाप्टर २ प्रदर्शीत झाल्यानंतर प्रेक्षकांनी दिलेल्या जबदरदस्त प्रतिसादामुंळ आम्हाला सर्वांना खूप आनंद झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.