Poonam Pandey
Poonam PandeySaam Tv

“मेरी बेटी नहीं मेरा बेटा है ये”... म्हणून पूनम पांडे झाली भावुक

Published on

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा (Kangana Ranaut) रिअॅलिटी शो 'लॉक अप' (Lock Upp) सध्या चांगलाच लोकप्रिय ठरत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) बघायला मिळणारा हा शो स्पर्धकांच्या सीक्रेट्समुळे सोशल मीडियावर गाजताना दिसत आहे. अंतिम फेरीच्या अगोदर, निर्मात्यांनी स्पर्धकांच्या प्रिय व्यक्तींना स्पर्धकांना अंतिम टप्प्यात जाण्याआधी भावनिक पाठिंबा देण्यासाठी बोलावले. अनेक स्पर्धकांच्या कुटुंबातील सदस्यांनी 'लॉक अप' या शोमध्ये प्रवेश केल्यामुळे बोल्ड सीनमुळे चर्चेत असणारी मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey) प्रिन्स नरुला आणि मुनावर फारुकी यांच्यासमोर भावुक झाली, त्याला कारण देखील तितकंच भावनिक आहे. पूनम पांडेच्या आईने या शोमध्ये एण्ट्री केल्यावर ती थक्क झाली.

Poonam Pandey
केंद्राकडून सापत्न वागणूक; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तीव्र नाराजी

शोदरम्यान आधी पूनमला तिच्या बहिणीचा मेसेज आला. मेसेजनंतर लगेचच तिची आई दारातून आत आली. तिने येऊन आपल्या मुलीला घट्ट मिठी मारली. आई-मुलीचा भावनिक क्षण  पाहून शोमधील सर्व सहकाऱ्यांना अश्रू अनावर झाले होते. पूनमला तिचे अश्रू आवरता आले नाहीत, तर तिची आई इतर स्पर्धकांशी बोलताना म्हणाली, “ये लड़की मेरेको बहुत सुख दी बेटा जीवन में. ये लडकी हर खुशी पूरी की है. (या मुलीने आम्हाला खूप सुख दिले आहे, तिने आमच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या आहेत). जिंदगी में ऐसा कोई चीज नहीं था जो ये लड़की ने हमे दी नहीं है. रोम रोम से दुआ निकलता है इसके लिए (एकही गोष्ट या मुलीने आम्हाला दिली नाही, असं नाही. तिला खूप आशीर्वाद देते)”

त्यानंतर पूनम पांडेच्या आईने स्पर्धकांना लाडू द्यायला सांगितले. “मुह मीठा करेंगे,” असं पूनमच्या आई म्हणाल्या.  तिला काही चांगली बातमी सांगायची होती. पूनमला लाडू खाऊ घातल्यानंतर तिच्या आईने खुलासा केला की, पूनमच्या वहिनीला जुळ्या मुली झाल्या आहेत. आपल्या मुलीबद्दल बोलताना पूनमची आई भावूक झाली आणि म्हणाली, “मेरी बेटी नहीं मेरा बेटा है ये (माझी मुलगी नाही तर माझा मुलगा आहे).” लॉक अपमध्ये अपशब्द बोलल्याबद्दल पूनम तिच्या आईची माफी मागताना दिसली. निरोप घेण्यापूर्वी पूनमच्या आईने तिची नजर काढली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com