Coffee With Karan 8: ‘कॉफी विथ करण सीझन ८’ लवकरच.. शाहरुख खान करणार शुभारंभ

करणचे सातही सीझन चांगलेच हिट ठरल्यानंतर लवकरच आठवा सीझन करण घेऊन येत आहे, त्याच्या आगामी भागात कोणते सेलिब्रिटी येणार अशी चर्चा सध्या होत आहे.
Coffee With Karan 8 With Shah rukh khan
Coffee With Karan 8 With Shah rukh khan Twitter
Published On

Coffee With Karan 8 Coming Soon: बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर नेहमीच आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. तो अनेकदा फॅशनमुळेही चर्चेत असतो. सोबतच, करणचा ‘कॉफी विथ करण’ देखील हा शो बराच चर्चेत असतो. करणचे सातही सीझन चांगलेच हिट ठरल्यानंतर लवकरच आठवा सीझन करण घेऊन येत आहे. आठव्या सीझनची सोशल मीडियावर चर्चा अधिक असताना, त्याच्या आगामी भागात कोणते सेलिब्रिटी येणार अशी चर्चा सध्या होत आहे.

Coffee With Karan 8 With Shah rukh khan
Kapil Sharma Post: रामनवमीच्या शुभ दिनी कपिलने केली ही खास गोष्ट, सर्वाचं मन जिंकलं

मिळालेल्या माहितीनुसार, ‘कॉफी विथ करण’च्या आठव्या सीझनमध्ये पहिल्याच भागात शाहरुख खान येण्याची शक्यता आहे. ‘बॉलिवूड हंगामा’ने दिलेल्या माहितीनुसार, ‘कॉफी विथ करण’चा आठवा सीझन येत्या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात त्याचा आठवा सीझन येण्याची शक्यता आहे. रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, सीझनच्या पहिल्या भागात बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान येणार आहे.

Coffee With Karan 8 With Shah rukh khan
Filmfare Award Marathi 2022: फिल्मफेअरमध्ये 'गोदावरी'ने मारली बाजी; पटकावले 'हे' पुरस्कार

‘कॉफी विथ करण’च्या अनेक सीझनमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. पण गेल्या सीझनपासून करणच्या शोमध्ये काहीसं वेगळंच चित्र दिसून आलं. सातव्या सीझनमध्ये समंथा रुथ प्रभू आणि विजय देवरकोंडाने हजेरी लावली होती. सोबतच आता ‘कॉफी विथ करण’च्या आठव्या सीझनमध्ये यंदा साऊथचे सेलिब्रिटीही आपला जलवा दाखवणार आहेत. रिपोर्टनुसार, या सीझनमध्ये यश, अल्लू अर्जुन आणि ऋषभ शेट्टी देखील त्यांच्या लाइफ पार्टनरसोबत शोमध्ये दिसू शकतात.

करण जोहर ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक म्हणून कमबॅक करत आहे. करणच्या चित्रपटात प्रमुख भूमिकेत रणवीर सिंग, आलिया भट्ट, धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट येत्या 28 जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. दरम्यान चित्रपटाच्या सेटवरील रणवीर-आलियाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com