Karisma Kapoor: 'करिश्माच्या मुलांसाठी काहीही सोडलं नाही...' संजय कपूरच्या बहिणीने प्रिया सचदेववर लावले गंभीर आरोप

Karisma Kapoor EX Husband: करिश्मा कपूरचे एक्स पती, दिवंगत उद्योगपती संजय कपूर यांच्या बहिणीने अलीकडेच एका मुलाखतीत अनेक संजय कपूर यांच्या प्रॉपर्टीबद्दल आणि कुटुंबाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
Karisma Kapoor EX Husband
Karisma Kapoor EX HusbandSaam Tv
Published On

Karisma Kapoor EX Husband: करिश्मा कपूरचा एक्स नवरा संजय कपूरच्या निधनानंतर, अभिनेत्रीची मुले आणि प्रिया सचदेव यांच्यात त्याच्या वारसा हक्कावरून कायदेशीर लढाई सुरू आहे. दरम्यान, संजय कपूर यांची बहीण, मंधीरा कपूर स्मिथने एका मुलाखतीत तिच्या कुटुंबाबद्दल, संजयची तिसरी पत्नी प्रिया आणि करिश्मा याबद्दल अनेक तपशील शेअर केले.

करिश्माच्या मुलांना पूर्ण अधिकार आहेत

विकी लालवानी यांना दिलेल्या मुलाखतीत मंधिरा म्हणाली, "समायरा आणि कियानचा संजयच्या मालमत्तेवर १०० टक्के अधिकार आहेत. माझ्या वडिलांनी आम्हा तिघांनाही स्पष्टपणे सांगितले की त्यांचे सहा नातवंडे त्यांच्या आयुष्याचे केंद्र आहेत. त्यांनी असेही म्हटले की आमचे लग्न टिकले की नाही याचा आमच्या नातवंडांवर परिणाम होऊ नये."

Karisma Kapoor EX Husband
Actor scandal: 'दुसऱ्या मुलीसोबत हॉटेलमध्ये गेला...', प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचे पुन्हा गंभीर आरोप, रडत म्हणाली...

ती पुढे म्हणाली, "करिश्मा आमच्या घरात वाढली आणि आम्ही चांगले मित्र होतो. आम्ही काही काळ एकमेकांशी बोलत नव्हतो, पण आता सगळं ठिक आहे. मी आणि माझी आई अजूनही तिच्याशी बोलतो. शेवटी, ती फक्त माझी बाल मैत्रीण नाही, तर कुटुंबाचा भागही आहे. ती नेहमीच आमच्यासाठी कुटुंब होती आणि नेहमीच राहील."

Karisma Kapoor EX Husband
Kantara Chapter 1: बक्कळ कमाई करणाऱ्या ऋषभ शेट्टीच्या चित्रपटाचा खास सन्मान; राष्ट्रपती भवनात 'कांतारा'ची विशेष स्क्रिनिंग

आमचे संपूर्ण कुटुंब रस्त्यावर आलं...

त्याच मुलाखतीत, मंधिरा म्हणाली, "संजयने त्याच्या मुलांसाठी काहीही सोडले नाही हे अजिबात बरोबर वाटत नाही. माझ्या आईची पहिली प्रतिक्रिया होती, 'हे अशक्य आहे की त्याने त्याच्या मुलांसाठी काहीही सोडले नाही. माझ्या आईने ते घर झाडाखाली बसून बांधले होते. आता तिच्याकडे घरही नाही. सगळं प्रियाकडे गेलं? हा एक चमत्कार आहे. प्रत्येकाचं लग्न असंच असावं. आमचं संपूर्ण कुटुंब रस्त्यावर आहे आणि तिने सगळं काही ताब्यात घेतलं आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com