Karishma Kapoor Children: संजय कपूरच्या प्रॉपर्टीत हिस्सा पाहिजे; करिश्मा कपूरच्या मुलांची हायकोर्टात धाव, नेमका वाद काय?

Karishma Kapoor Children: करिश्मा कपूरच्या मुलांनी सावत्र आई प्रिया कपूरवर बनावट मृत्युपत्र बनवल्याचा आरोप केला आहे. यामुळे संजय कपूरच्या ३०,००० कोटी रुपयांच्या मालमत्तेचा वाद आणखी वाढला आहे.
Karishma Kapoor Children
Karishma Kapoor ChildrenSaam Tv
Published On

Karishma Kapoor Children: अभिनेत्री करिश्मा कपूरची मुले - समायरा कपूर (२०) आणि कियान राज कपूर (१५) यांनी त्यांचे वडील आणि प्रसिद्ध उद्योगपती संजय कपूर यांच्या मालमत्तेत वाटा मिळावा यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुलांचा आरोप आहे की त्यांची सावत्र आई प्रिया कपूर यांनी संशयास्पद मृत्युपत्राच्या आधारे संपूर्ण मालमत्ता तिच्या नावावर करण्याचा प्रयत्न केला आहे.

वाद काय आहे

जून २०२५ मध्ये लंडनमध्ये पोलो खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने संजय कपूर यांचे निधन झाले. ते फक्त ५३ वर्षांचे होते. त्यांच्या मृत्यूनंतर, जुलैमध्ये एक मृत्युपत्र समोर आले, ज्याची तारीख २१ मार्च २०२५ होती. यामध्ये, संपूर्ण मालमत्ता प्रिया कपूरच्या नावावर करत असल्याचे लिहीले होते. मुलांचा दावा आहे की हे मृत्युपत्र "संशयास्पद परिस्थितीत तयार केले गेले होते आणि कदाचित ते बनावट आहे."

Karishma Kapoor Children
Akshay Kumar Birthday: '१५० हून अधिक चित्रपट आणि...', वाढदिवसानिमित्त खिलाडी कुमारची खास पोस्ट, मानले प्रेक्षकांचे आभार

मुलांची मागणी

समायरा आणि कियान यांनी न्यायालयाला विनंती केली आहे की मालमत्ता कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीला विकणे, हस्तांतरित करणे यावर बंदी घालावी. त्यांनी अशीही मागणी केली आहे की त्यांना मालमत्तेत वाटा द्यावा. प्रिया कपूर, तिचा मुलगा, संजयची आई राणी कपूर आणि मृत्युपत्राची अंमलबजावणी करणारी श्रद्धा सुरी मारवाह यांना या प्रकरणात प्रतिवादी म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे.

Karishma Kapoor Children
Akshay Kumar Birthday: '१५० हून अधिक चित्रपट आणि...', वाढदिवसानिमित्त खिलाडी कुमारची खास पोस्ट, मानले प्रेक्षकांचे आभार

३०,००० कोटी रुपयांचे साम्राज्य

संजय कपूर हे सोना कॉमस्टारचे अध्यक्ष होते. कंपनीचे मार्केट कॅप सुमारे ३०,००० कोटी रुपये आहे. यापैकी २८% हिस्सा ऑरियस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड या कुटुंब गुंतवणूक कंपनीकडे आहे. मुलांचा आरोप आहे की प्रिया कपूरने आधीच या कंपनीचा आणि कपूर कुटुंबाच्या आरके ट्रस्टचा ताबा घेतला आहे.

करिश्माचा मुलांना पाठिंबा

करिश्मा कपूर स्वतः या कायदेशीर लढाईत थेट सहभागी नाहीये, परंतु सूत्रांनुसार ती तिच्या मुलांसाठी पूर्णपणे त्यांच्यासोबत आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी लवकरच दिल्ली उच्च न्यायालयात होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com