The Buckingham Murders BFI Festival Screening: करीना कपूरला वाढदिवसाआधीच मिळालं मोठं गिफ्ट; सोशल पोस्टमधून 'लय भारी' रिॲक्शन

The Buckingham Murders Premiere At BFI Festival: अभिनेत्रीने सोशल मीडियावर आगामी ‘द बकिंगहॅम मर्डर्स’ चित्रपट लंडनच्या बीएफआय फेस्टिव्हलमध्ये दाखवला जाणार असल्याची माहिती दिली आहे.
Kareea Kapoor The Buckingham Murders Premiere At BFI Festival
Kareea Kapoor The Buckingham Murders Premiere At BFI FestivalInstagram
Published On

Kareea Kapoor The Buckingham Murders Premiere At BFI Festival

बॉलिवूडची बेबो सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. तिच्या वाढदिवशी अर्थात २१ सप्टेंबरला ‘जाने जान’ चित्रपटातून अभिनेत्री ओटीटी विश्वामध्ये पदार्पण करते. आतापर्यंत आपण करीना कपूर- खानला रुपेरी पडद्याच्या माध्यमातून पाहिले होते. आता लवकरच अभिनेत्री ओटीटी विश्वात पदार्पण करतेय.

अभिनेत्रीला तिच्या वाढदिवसाच्या आधीच मोठं गिफ्ट मिळालंय. नुकतंच अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचा आगामी ‘द बकिंगहॅम मर्डर्स’ नावाचा चित्रपट लंडनच्या बीएफआय फेस्टिव्हलमध्ये दाखवला जाणार असल्याची माहिती दिली आहे. अभिनेत्रीने तिच्या वाढदिवसाआधीच चाहत्यांना ही न्यूज दिल्यामुळे चाहत्यांकडून कौतुक होत आहे.

हंसल मेहता दिग्दर्शित ‘द बकिंगहॅम मर्डर्स’ (The Buckingham Murders) चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे. कायमच आपल्या वैविध्यपूर्ण कथेसाठी आणि प्रयोगशील कृतीसाठी दिग्दर्शक हंसल मेहता चर्चेत असतात.

दिग्दर्शक हंसल मेहतांची आज अर्थात १ सप्टेंबरला सोनी लिव्हवर ‘स्कॅम २००३: द तेलगी स्टोरी’ ही वेबसीरिज प्रदर्शित झाली आहे. वेबसीरिजची कथा अब्दुल करीम तेलगीच्या आयुष्यावर आधारित आहे.

हंसल मेहतांचा ‘द बकिंगहॅम मर्डर्स’ (The Buckingham Murders) या चित्रपटाची लंडनच्या ६७व्या बीएफआय चित्रपट महोत्सवामध्ये स्पेशल स्क्रिनिंग होणार आहे. ही माहिती अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केली असून या चित्रपटाची पुन्हा एकदा तुफान चर्चा होत आहे.

करीना शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हणाली, “हंसल मेहतांचं दिग्दर्शन आणि एकता कपूरने निर्मित केलेल्या ‘द बकिंगहॅम मर्डर्स’ (The Buckingham Murders) या चित्रपटाचं लंडनच्या प्रसिद्ध चित्रपट महोत्सवामध्ये प्रिमियर होणार आहे. याचा मला विशेष आनंद आहे. चित्रपटाची कथा थ्रिलर असून त्याची कथा देखील एक वेगळीच आहे. लंडनच्या प्रसिद्ध चित्रपट महोत्सवामध्ये भारतातील एकूण तीन चित्रपटांची निवड झालेली आहे. त्यातील माझा हा एक चित्रपट आहे. जर तुम्ही लंडनमध्ये असाल, तर तुम्हाला ही तो चित्रपट त्या चित्रपट महोत्सवामध्ये पाहचा येणार आहे. १४ ऑक्टोबरला कर्झन मेफेअर येथे तर, १५ ऑक्टोबरला व्ह्यू लीसेस्टर स्क्वेअर येथे चित्रपटाचं प्रीमियर होणार आहे.” अशा शब्दांत करीनानं तिची प्रतिक्रिया दिली.

अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, अभिनेत्री लाल सिंह चड्ढानंतर अभिनेत्री ‘जाने जान’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्रीचा ‘द बकिंगहॅम मर्डर्स’ हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झाला नाही. प्रदर्शनाआधीच चित्रपटाची सोशल मीडियावर तुफान चर्चा होतेय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com