Karate Kid Legends Collection Day 3: अजय देवगनच्या आवाजात हिंदीत डब केलेल्या 'कराटे किड: लिजेंड्स' या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या दिवशीच या चित्रपटाने 1.6 कोटी रुपयांची कमाई केली, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्साह दिसून आला. अजय देवगनच्या आवाजातील प्रभावी संवाद आणि 'कराटे किड' फ्रँचायझीची लोकप्रियता यामुळे चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
चित्रपटाच्या दुसऱ्या दिवशी, शनिवारी, कमाईत थोडीशी घट झाली, परंतु रविवारी, तिसऱ्या दिवशी, चित्रपटाने पुन्हा एकदा उंच भरारी घेतली. संडेच्या कमाईत वाढ होऊन, चित्रपटाने एकूण 6.12 कोटी रुपयांची कमाई केली आहे. विशेषतः मुंबई, दिल्ली, पुणे आणि बेंगळुरु या शहरात चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
कराटे किड लेजेंड्सची कमाई
दिवस १: १.६ कोटी
दिवस ४: २.३९ कोटी
दिवस ३: २.१९ कोटी
एकूण: ६.१२ कोटी
'कराटे किड: लिजेंड्स' हा चित्रपट केवळ अॅक्शन आणि मार्शल आर्ट्सवर आधारित नसून, त्यात कौटुंबिक मूल्ये, शिस्त आणि आत्मविश्वास यांचा संदेशही दिला आहे. अजय देवगनच्या आवाजातील पात्राने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. चित्रपटातील अॅनिमेशन आणि कथा यामुळे लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आकर्षित केले आहे.
चित्रपटाच्या यशामुळे निर्मात्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विशेषतः अजय देवगनच्या आवाजासह या चित्रपटातील प्रमुख पात्राला अजय देवगणचा मुलगा युग देवगणने देखील आवाज दिला आहे. त्यामुळे युगचा हा पहिला आपल्या वडीलांसोबतचा चित्रपट आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.