Kangana Ranaut At Trimbakeshwar Temple
Kangana Ranaut At Trimbakeshwar TempleSaam Tv

Kangana Ranaut At Trimbakeshwar Temple : कंगना रनौत त्र्यंबकेश्वराच्या चरणी लीन

Kangana Ranaut : कंगनाने महाराष्ट्रातील एका तीर्थस्थानाला भेट दिली आहे.
Published on

Kangana Ranaut Visited Trimbakeshwar : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत देववेडी आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. हिंदू धर्माचा पुरस्कार करणारी कंगना नेहमीच विविध पूजा आणि देवदर्शन करत असते. नुकतेच कंगनाने महाराष्ट्रातील एका तीर्थस्थानाला भेट दिली आहे.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेण्यासाठी कंगना गेली होती. कंगना त्र्यंबकेश्वराच्या चरणी लीन झाली आहे. गुरुवारी संध्याकाळी आपल्या कुटुंबियांसमवेत कंगना रानौतने त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतले आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थानकडून कंगनाचा सत्कार करण्यात आला आहे. (Latest Entertainment News)

Kangana Ranaut At Trimbakeshwar Temple
Sharad Ponkshe Share Post : बापाला आणखी काय हवं ? पायलट लेकीसाठी शरद पोंक्षेंची खास पोस्ट

कंगनाने त्र्यंबकेश्वर येथील फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. कंगना यावेळी सलवार सूटमध्ये दिसत आहे. तसेच तिचे कुटुंबीय देशील या फोटोंमध्ये दिसत आहेत.अभिनेत्री कंगनाने शंकराची ओढ आहे. श्रावणातील सोमवारी कंगनाने तिच्या घरी रुद्र अभिषेकाचे आयोजन केले होते.

कंगनाने काही दिवसांपूर्वी केदारनाथला जाऊन महादेवाचे दर्शन कंगनाने महादेवाचे दर्शन घेतले. कंगनाचे केदारनाथमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Kangana Ranaut At Trimbakeshwar Temple
Happy Birthday Dhanush: दिसण्यावरुन हिणवलं, 'ऑटो ड्रायव्हर' म्हणून चिडवलं, धनुष असा झाला टॉलिवूडचा 'सुपरस्टार'

कंगनाच्या वर्कप्रंटबद्दल बोलायचे तर, कंगनाचा निर्मिती अससेला 'टिकू वेड्स शेरु' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तर कंगनाच्या 'तेजस' चित्रपटाचा लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

कंगनाचा तमिळ हॉरर कॉमेडी असलेला 'चंद्रमुखी २' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आयुष्यावर आधारित 'इमरजन्सी' या चित्रपटात कंगना मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com