Nawazuddin Siddiqui Controversy: 'मौनने नेहमी शांतता मिळत नाही...' नवाजुद्दीन सिद्दिकीसाठी केलेली कंगनाची पोस्ट चर्चेत

नवाजुद्दीन सिद्दिकीच्या घरगुती वादात कंगनाची उडी.
Kangana Ranaut Reacts On Nawazuddin Siddiqui Controversy
Kangana Ranaut Reacts On Nawazuddin Siddiqui ControversySaam TV

Kangana Ranaut Reacts On Nawazuddin Siddiqui Controversy: अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी आणि त्याच्या पत्नीतील वाद सर्वांना माहीतच आहे. काल नवाजुद्दीन सिद्दिकी यावर मौन सोडत त्याची प्रतिक्रिया दिली. त्याने व्यक्त केलेल्या भावनांवर कंगना रनौतने ट्विट केले आहे.

नवाजुद्दीन सिद्दिकी याने त्याच्या पूर्वाश्रमीची पत्नी आलिया सिद्दीकीने केलेल्या आरोपांवर त्याची बाजू मांडणारी पोस्ट केली आहे. नवाजुद्दीन सिद्दिकी केलेल्या पोस्टवर कंगना रनौतने त्याला पाठिंबा दिला आहे. सोमवारी तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर कंगनाने लिहिले की, "खूप गरज होती @nawazuddin._siddiqui saab (sir)... मौन नेहमीच शांतता देत नाही... मला आनंद आहे की तुम्ही तुमचे स्टेटमेंट दिले."

त्यानंतर कंगनाने पुन्हा ट्विटरवर पोस्ट करत लिहिले की, “, @Nawazuddin_S साब (सर), तुमचे अनेक चाहते आणि शुभचिंतक आहेत ज्यांना तुमची बाजू जाणून घेण्याची वाट बघत आहेत.”

Kangana Ranaut Reacts On Nawazuddin Siddiqui Controversy
Pawan Singh: 'लॉलीपॉप लागेलू' फेम भोजपुरी स्टार पवन सिंहच्या कार्यक्रमात राडा

नवाजुद्दीन सिद्दीकीने सोमवारी इन्स्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट शेअर केली. त्यात त्याने असे लिहिले होते की, "माझ्या मौनामुळे मला सर्वजण वाईट माणूस म्हणून समजत आहेत . मी गप्प बसण्याचे कारण म्हणजे हा सर्व तमाशा (शो) कुठेतरी माझी लहान मुले वाचतील. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, प्रेस आणि अनेकजण एकतर्फी आणि फेरफार केलेल्या व्हिडिओंच्या आधारे माझ्या चारित्र्य हत्येचा आनंद घेत आहेत.

काही मुद्दे आहेत, मी व्यक्त करू इच्छितो. १. सर्वप्रथम मी आणि आलिया अनेक वर्षांपासून एकत्र राहत नाही, आमचा घटस्फोट झाला आहे पण आम्हाला निश्चितपणे फक्त आमच्या मुलांसाठी एकत्र यावे लागेल ही समज होती."

"तिला फक्त जास्त पैसे हवे आहेत आणि म्हणून तिने माझ्यावर आणि माझ्या आईवर असंख्य केसेस दाखल केल्या आहेत आणि हे तिचे नेहमीचे आहे, तिने यापूर्वीही असेच केले आहे आणि तिच्या मागणीनुसार पैसे दिल्यावर केस मागे घेतली आहे. "

नवाजुद्दीनच्या समर्थनार्थ कंगना पुढे येण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या महिन्यात, आलियाने तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीसोबत तिच्या शाब्दिक भांडणाचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता जेव्हा तो घराच्या बाहेर उभा होता.

नवाज सरांचा त्यांच्या घराबाहेर असा अपमान होतोय... त्यांनी आपलं सगळं काही कुटुंबाला दिलं, ते अनेक वर्ष भाड्याने राहिले... ते TWS शूटला रिक्षाने यायचे. गेल्या वर्षीच त्यांनी हा बंगला विकत घेतला आणि आता त्यांची पूर्वाश्रमीची पत्नी त्यावर हक्क सांगायला आली आहे..खूप वाईट." TWS हा नवाजुद्दीनचा आगामी चित्रपट, टिकू वेड्स शेरू आहे.

कंगनाने लिहिले आहे की, "मी आणि त्यांची पत्नीला कधीच भेटले नाही. पण आता अचानक तिने बंगला ताब्यात घेतला आहे आणि त्याला आत जाऊ दिले नाही, मी फक्त पाहिले की ते रस्त्यावर उभे आहेत आणि ती एवढ्या मोठ्या स्टारचे व्हिडिओ बनवत आहे, काय नालयाकपणा आहे हा. हे पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं... अभिनय करून पैसे कमवणं सोपं नाही, कलाकार खूप मेहनत करतात, ती कशी ठरवू शकते की घराचा ताबा घेऊन शकते आणि त्यांना असं बाहेर कुलूप लावायचं."

गेल्या महिन्यात, मुंबई उच्च न्यायालयाने नवाजुद्दीन आणि आलियाला त्यांच्या दोन अल्पवयीन मुलांबद्दलचे मतभेद सामंजस्याने सोडवण्याचा प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. त्यांनी त्यांच्या पत्नीला त्यांच्या मुलांचा ठावठिकाणा उघड करण्याचे निर्देश मागणार्‍या हॅबियस कॉर्पस याचिकेसह उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com