Pawan Singh: 'लॉलीपॉप लागेलू' फेम भोजपुरी स्टार पवन सिंहच्या कार्यक्रमात राडा

प्रसिद्ध भोजपुरी गायक पवन सिंहच्या यांच्या कार्यक्रमात काल राडा झाला.
Pawan Singh
Pawan SinghSaam TV

'लॉलीपॉप लागेलू' हे गाणे गाणाऱ्या प्रसिद्ध भोजपुरी गायक पवन सिंहच्या यांच्या कार्यक्रमात काल राडा झाला. उत्तर प्रदेशातील बलियामध्ये सोमवारी रात्री जमावातील काहींनी दगड फेकला. हा दगड पवन सिंगच्या गालाला लागला आणि ते जखमी झाला. त्यानंतर चेंगराचेंगरी देखील झाली त्यात खुर्च्या देखील तुटल्या. पोलिसांनी लाठीचार्ज करून हल्लेखोरांचा पाठलाग केला.

पण यांच्या शो दरम्यान एका दर्शकाने पवनला एक विशिष्ट गाणे गाण्याची विनंती केली होती. हे गाणे एका जातीशी संबंधित असल्याने पवन सिंहने ते गाण्यास नकार दिला. यानंतरच त्याच्यावर दगडफेक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

ही संपूर्ण घटना नागरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिकामी गावात घडली आहे. येथे लग्नाचे रिसेप्शन होते. यात पवन सिंग, शिल्पी राज आणि अंजना सिंग यांनी बोलविण्यात आले होते. पवनचे गाणे ऐकण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. त्यासाठी आयोजकांनी प्रशासनाची परवानगी देखील घेतली होती. सुरक्षेसाठी अनेक पोलीस फौजफाटा, पीएसी उपस्थित होता.

Pawan Singh
Boyfriend Beats Actress : चेहरा सुजला, काळानिळा पडला... मल्याळम अभिनेत्रीला एक्स बॉयफ्रेंडकडून मारहाण आणि धमकी

दगडफेक झाल्यानंतर पवन संतापला आणि म्हणाला, "कोण आहे हा महान व्यक्ती जो गर्दीत लपून दगडफेक करतोय. माझ्यावर दगडफेक करणारा हा शत्रू कोण आहे. या गर्दीत सगळे चाहते आले आहेत. हिंमत असेल तर माझ्या जो कोणी शत्रू आहे त्याने पुढे यावे. असा लपून हल्ला करू नका. एका दगड पवनला रोखू शकत नाही, आजपर्यंत कोणीही रोखू शकला नाही.

पवनने स्टेजवरून हे सांगताच गोंधळ वाढला. जमावाने खुर्च्या फोडण्यास सुरुवात केली. दगडफेक करण्यास सुरू केली. बॅरिकेडिंग तोडले. चेंगराचेंगरीची सुद्धा झाली. अशा स्थितीत पोलीस आणि पीएसीने लाठीचार्ज करून हल्लेखोरांचा पाठलाग केला. काही तासांनंतर प्रकरण शांत झाल्यावर गायिका शिल्पी राजने मंचावर येत पुढाकार घेतला आणि जमावाला शांत केले. मात्र, पवन सिंग पुन्हा मंचावर आलेच नाही.

पोलिस स्टेशनचे अध्यक्ष ब्रिजेश कुमार सिंह यांनी सांगितले की, याप्रकरणी कोणतीही तक्रार आलेली नाही. ना पवन सिंगकडून ना आयोजकांच्या बाजूने. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. कोणी दगडफेक केली. त्याच्यावर कारवाई केली जाईल. व्हिडिओ फुटेज तपासले जात आहे. हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.

पवन सिंह यांनी 80 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि 200 हून अधिक भोजपुरी संगीत अल्बम शूट केले आहेत. 2008 मध्ये प्रदर्शित झालेला पवन सिंगचा "लॉलीपॉप लागेलू" हा अल्बम खूप गाजला. या गाण्याने पवन सिंगला स्टार बनवले. ‘क्रॅक फायटर’ या भोजपुरी चित्रपटासाठी पवनने एक कोटी रुपये घेतल्याचे सांगितले जाते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com