सलमान खानने (Salman Khan) चित्रपट समीक्षक आणि अभिनेता केआरके (कमल आर खान) (Kamal Khan) याच्याविरूद्ध मानहानीचा खटला दाखल केला आहे. मुंबईच्या शहर दिवाणी कोर्टाने बुधवारी एक अंतरिम आदेश जारी करून केआरकेला सोशल मीडियावर किंवा कोठेही सलमान खान, त्याचे चित्रपट आणि कुटुंबीयांविरूद्ध कोणतीही प्रतिक्रिया न देण्याचे सांगितले आहे. कोर्टाच्या या आदेशाला आता केआरकेने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
या मानहानी प्रकरणात हायकोर्ट आणि सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय त्याने एकामागून एक ट्विट करून केला आहे. तसेच, केआरके यांनी म्हटले आहे की मी चित्रपटांवर रिव्ह्यूव देणे सुरूच ठेवणार आहे. केआरकेने आपल्या पहिल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'मी सलमान खान विरूद्ध मानहानी प्रकरणाबाबत कोर्टाचा आदेश वाचला आहे आणि मी त्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत मी पोस्ट केलेले व्हिडिओ काढण्याचे आदेश कोर्टाने मला दिले नाहीत. परंतु कोर्टाने मला भविष्यात सलमान खानच्या कोणत्याही चित्रपटा बद्दल रिव्ह्यूव न घेण्याचे आदेश दिले आहेत.
त्यांच्या पुढच्या ट्विटमध्ये केआरकेने लिहिले, 'माझे म्हणणे आहे की या चित्रपटाबद्दल रिव्ह्यूव देणे हे माझे वैयक्तिक मत आहे आणि कोर्टाने माझे वैयक्तिक मत व्यक्त करण्यास मला थांबवू नये. म्हणून मी माझ्या अधिकाराचे संरक्षण करण्यासाठी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. मी चित्रपट समीक्षक आहे आणि हे माझे काम आहे, म्हणून मी चित्रपटांबद्दल रिव्हिव देणाराच आहे'.
केआरकेने आपल्या तिसर्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'प्रथम बॉलिवूड मधील लोकांनी माझी चेष्टा करण्याचा प्रयत्न केला. मग त्यांनी मला भ्रष्ट सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. आणि आता ते सर्व न्यायालयांना सांगून चित्रपटांचे रिव्हिव देण्यापासून रोखत आहेत. ही प्रामाणिकपणाची ताकत आहे. त्यांच्याकडे 100 भ्रष्ट समीक्षक आहेत, परंतु तरीही त्यांना प्रामाणिक टीकाकारांची भीती वाटते.
Edited By : Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.