Kajol Maa Movie : २ तिकिटांवर १ तिकीट फ्री; 'माँ'च्या यशासाठी अजय देवगणनं दिली तगडी ऑफर, शेवटची तारीख काय?
बॉलिवूड अभिनेत्री काजोल (Kajol) सध्या तिचा आगामी चित्रपट 'माँ' मुळे चांगलीच चर्चेत आहे. 'माँ' (Maa Movie) चित्रपट 27 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग (Advance Booking Offer) सुरू झाले आहे. चाहते चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक असल्याचे दिसत आहे. कारण चित्रपटात काजोल एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एक हटके ऑफर देण्यात आली आहे. याची पोस्ट काजोलचा नवरा बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने केली आहे.
अजय देवगण पोस्ट
अजय देवगणने या पोस्टला हटके कॅप्शन दिलं आहे. त्याने लिहिलं की, "चंद्रपूर के डर का मजा सबके साथ ही आएगा! 2 तिकिटे खरेदी करा आणि 1 विनामूल्य मिळवा...ॲडव्हान्स बुकिंग सुरू...लवकर करा ऑफर या शुक्रवारपर्यंत मर्यादित आहे." आता रिलीजच्या पहिल्या दिवसापासून 'माँ' बॉक्स ऑफिसवर कसा धुमाकूळ घालते हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
'माँ' चित्रपट
काजोलचा 'माँ' चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू आणि बंगाली भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात एका आईच्या संघर्षाची कथा दाखवण्यात आली आहे. चित्रपटातील कोजालचे शक्तिशाली रूप पाहून चाहते भारावून गेले आहेत. चित्रपटात
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.