Kairee: जगात सगळ्यात महत्वाचं असतं प्रेम ...; सायली-शशांकच्या लव्हस्टोरीत थ्रिलर सस्पेन्सचा तडका

Kairee Marathi Movie: ‘कैरी’चा रोमँटिक थ्रिलर ट्रेलर प्रदर्शित झाला असून सायली–शशांकची केमिस्ट्री, कोकणातील निसर्गरम्य लोकेशन्स आणि अनपेक्षित ट्विस्टने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Kairee Marathi Movie
Kairee Marathi Moviesaam tv
Published On

Kairee Marathi Movie: उन्हाळ्यात चाखायला मिळणारी कैरी आता हिवाळ्यात चाखायला मिळणार हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला होता. कारण 'कैरी' हा बिगबजेट आणि मल्टीस्टारर सिनेमा येत्या १२ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पोस्टरच्या उत्सुकतेनंतर यांत आता भर घालत 'कैरी' चित्रपटाचा ट्रेलर समोर आला आहे. आणि अनेक टर्न ट्विस्ट असलेला हा ट्रेलर चित्रपटाची उत्सुकता वाढवत आहे. नॅशनल अवॉर्ड विनिंग दिग्दर्शक शंतनू गणेश रोडे यांचा रोमँटिक थ्रिलर ‘कैरी' हा सिनेमा येत्या १२ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमातून रोमँटिक थ्रिलर असा नेमका कोणता प्रवास पाहायला मिळणार याची उत्सुकता ट्रेलरने वाढविली आहे.

ट्रेलरमधून समोर आलेलं कोकणातील नयनरम्य, हिरव्यागार वातावरण झालेलं हे 'कैरी' चित्रपटाचं शूट साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. ट्रेलरच्या सुरुवातीलाच शशांक आणि सायलीची लव्हेबल केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. कोकणाच्या हिरव्यागार परिसरात त्यांचा रोमँटिक प्रवास खुलताना दिसत आहे. इतकंच नाहीतर कोकणातील लग्नाचा थाटमाटही चित्रपटात पाहायला मिळणार असल्याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली. आणि या जोडीच्या रोमँटिक प्रवासाला अचानक ब्रेक लागला. हो. ट्रेलरमध्ये मध्येच आलेला हा टर्न चित्रपटाच्या कथेची उत्सुकता वाढवत आहे. नवरा हरवला म्हणून पत्नीची सुरु असलेली घालमेल ट्रेलरमध्ये दिसत असून हा ट्विस्ट चित्रपटात काय रंगत आणणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे.

Kairee Marathi Movie
Prabhas: 'अ‍ॅनिमल' आणि 'पठाण'चा रेकॉर्ड ब्रेक! प्रभासच्या ३०० कोटींच्या चित्रपटाने रिलीजपूर्वीच कमावले 'इतके' कोटी

ट्रेलरमध्ये सायली संजीव, सुबोध भावे, सिद्धार्थ जाधव, शशांक केतकर, अरुण नलावडे, सुलभा आर्या या कलाकारांचा अभिनय लक्षवेधी आहे. तर शूटिंगची ठिकाणही नजरा वळवणारी आहेत. विशेषतः कोकणातील शूट साऱ्यांच्या पसंतीस पडत आहे. ‘कैरी' या चित्रपटाची निर्मिती ‘९१ फिल्म स्टुडिओज’ अंतर्गत झाली आहे. ‘लोच्या झाला रे’ आणि ‘शेर शिवराज’ या दोन ब्लॉकबस्टर व्यावसायिक अशा मराठी चित्रपटांनंतर ते ‘कैरी’ हा तिसरा सिनेमा घेऊन आले आहेत.

Kairee Marathi Movie
Artist Death: प्रसिद्ध पटकथा लेखकाचे निधन, मनोरंजन विश्वात शोककळा

कैरी’ हा सिनेमा इन असोसिएशन विथ ‘अमेय विनोद खोपकर एंटरटेंमेंट’चा आहे. तर ‘कैरी’ चित्रपटाची निर्मिती नवीन चंद्रा, नंदिता राव कर्नाड, स्वाती खोपकर, निनाद नंदकुमार बत्तीन यांनी केली आहे. तसेच तबरेझ पटेल हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. 'कैरी'चे लेखन स्वरा मोकाशी यांनी केले आहे. या चित्रपटाला निषाद गोलांबरे आणि पंकज पडघन यांनी संगीत दिलं आहे. तर पार्श्वसंगीताची जबाबदारी साई पियूष यांनी सांभाळली. तर चित्रपटाचे छायांकन प्रदीप खानविलकर यांचे आहे. आणि चित्रपटाच्या संकलनाची जबाबदारी मनीष शिर्के यांनी सांभाळली आहे. येत्या १२ डिसेंबरला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com