जंगलबुकचा 'बघिरा' नागझिऱ्यात...

किपलिंगच्या ‘जंगल बूक’ मध्ये वर्णन असणारा दुर्मिळ ‘बघिरा’ म्हणजेच काळा बिबट्या विदर्भातील वन्यजीव प्रेमींच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या नवेगाव - नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील नवेगाव भागात आढळला आहे.
जंगलबुकचा 'बघिरा' नागझिऱ्यात...
जंगलबुकचा 'बघिरा' नागझिऱ्यात...अभिजीत घोरमारे
Published On

गोंदिया - किपलिंगच्या ‘जंगल बूक’ Junglebook मध्ये वर्णन असणारा दुर्मिळ ‘बघिरा’ Baghira म्हणजेच काळा बिबट्या Leopard विदर्भातील वन्यजीव प्रेमींच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या नवेगाव - नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील नवेगाव भागात आढळला आहे. या काळ्या बिबट्याचे सोबतिणीसह चित्र सोशल मिडियावर Social Media चांगलेच व्हायरल झाले आहे. Junglebook's 'Baghira in Nagzira

हे देखील पहा -

सदर चित्र सर्वप्रथम डॉ. बिलाल हबीब Bilal Habib, वैज्ञानिक, भारतीय वन्यजीव संस्था यांनी त्यांच्या ट्विटर हॅंडल वर शेयर केले आहे. या चित्रात काळ्या रंगाचा बिबट्या आणि त्याच्या सोबत जंगलात विहार करणारी मादी एकत्र दिसत असून ही चित्र सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. नवेगाव- नागझिरा अभयारण्यात काळ्या रंगाच्या बिबट्या सोबत मादी आढळण्याची ही पहिलीच घटना ठरली आहे. नवेगाव नागझिरा टायगर रिझर्व्ह (एनएनटीआर) प्रकल्पातिल कॅमेरा ट्रॅपिंमधला हा डेटा असून तो डेहराडून येथील वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला पाठविण्यात आला आहे.

जंगलबुकचा 'बघिरा' नागझिऱ्यात...
पुणे-नाशिक रेल्वे भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध

डॉ. बिलाल हबीब यांनी आपल्या ट्वीटरवरून शेअर केलेल्या चित्रात एनएनटीआर लँडस्केपचा उल्लेख केला असून नवेगांव नागझिऱ्यात ही नर-मादी जोडी नेमक्या कोणत्या ठिकाणी आढळली याचा उल्लेख मात्र त्यांनी टाळला आहे. कर्नाटक राज्यातील काबिनी अभयारण्यात व ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पा आढळलेल्या काळ्या बिबटयानंतर आता नवेगाव- नागझिरा अभयारण्यात काळे बिबट आढळल्याने या अभयारण्यात टूरिझमला चालना मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com