रोहिदास गाडगे
पुणे - पुणे नाशिक रेल्वे Pune Nashik Railway आणि पुणे रिंग रोड Pune Ring Road ला खालुंब्रे, निघोजे, कुरुळी, मोई, चिंबळी, केळगाव, आळंदी, चऱ्होली, धानोरा, सोळू, मरकळ आणि गोलेगाव या बारा गावांनी तीव्र विरोध केला आहे. खेड प्रांत कार्यालयासमोर गेली सात दिवसांपासून "ज्ञानेश्वरी वाचन चक्री उपोषण"करूनही सरकाराला जाग येत नाही.रक्त सांडले तरी चालेल अशी आक्रमक भूमिका आंदोलक शेतकऱ्यांनी Farmer घेत आगामी आंदोलन तीव्र स्वरूपाचे असेल असा इशारा खेड तालुका रिंग रोड व पुणे नाशिक रेल्वे विरोधी कृती समितीच्या कार्यकर्त्यानी राजगुरूनगर Rajgurunagar येथे दिला. Farmers oppose Pune-Nashik railway land acquisition
हे देखील पहा -
पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे व रिंग रोड प्रकल्प संपादनाला 12 गावांचा विरोध आहे.शासनाकडून मात्र जमिनी संपादनासाठी सर्वेक्षण मोजणी सुरु आहे. त्याला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. या बाबत खेड तालुका रिंग रोड व पुणे नाशिक रेल्वे विरोधी कृती समितीच्यावतीने खेड प्रांताधिकारी कार्यालयासमोर गेली सात दिवसांपासून "ज्ञानेश्वरी वाचन चक्री उपोषण" सुरु आहे. मात्र राज्य शासन यावर कोणताच निर्णय घेत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले असून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. याबाबत आज आंदोलनकर्ते यांचे निवेदन स्वीकारण्यास प्रांताधिकाऱ्यानी नकार दिल्याने आंदोलनकर्त्यांनीआंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
रिंग रोड व रेल्वे प्रकल्पांना जमीन संपादन झाल्यास अनेक शेतकरी भूमिहीन, अनेक अल्पभुधारक होणार आहेत. रेल्वे मार्गाचा स्थानिक विकासाला उपयोग होणार नाही. रिंग रोड बंदिस्त स्वरूपाचा असल्याने उर्वरीत तुकडे पडणा-या क्षेत्रातील जमिनी कसता येणार नाहीत. व्यवसायिक उपयोग होणार नाही. हा प्रकल्प शासनाने आमच्यावर लादू नये.अशा भावना शेतकऱ्यांच्या होत्या मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत शासन बळजबरीने भूसंपादन करीत आहे. याचा या गावातील शेतकरी तीव्र निषेध करीत असून शेतकरी आत्मदहन, आत्महत्या पाण्यात उतरून आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत शासनाने वेळीच लक्ष घालावे अशी मागणी बाधित शेतकरी करीत आहेत.
Edited By - Shivani Tichkule
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.