जया बच्चन यांना कोरोनाची लागण, चित्रपटाचे शूटिंग थांबवले

काही दिवसांपूर्वी शबाना आझमी यांना कोरोनाची लागण झाली होती त्यानंतर जया बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
Jaya Bachchan
Jaya BachchanSaam Tv
Published On

मुंबई - करण जोहरचा आगामी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे. अलीकडेच या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री शबाना आझमीला कोरोना झाला होता. समोर आलेल्या माहितीनुसार, आता जया बच्चन यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. जया बच्चन (Jaya Bachchan) यांचा कोरोना (Corona) रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले आहे.

हे देखील पहा -

काही दिवसांपूर्वी शबाना आझमी यांना कोरोनाची लागण झाली होती त्यानंतर जया बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. याच कारणामुळे करण जोहरने 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चे शूटिंग थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. करण जोहरने गेल्या वर्षी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाची घोषणा केली होती.

Jaya Bachchan
गर्भवती महिलेसोबत गैरवर्तणूक; नांदेड जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

या चित्रपटात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या टीझरला देखील लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये रणवीर, आलिया, शबाना आणि जया बच्चन यांच्याशिवाय धर्मेंद्र देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सध्या कोरोनामुळे या चित्रपटाच्या शूटिंगवर परिणाम झाला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com