Jai Jai Swami Samarth : भक्तांसाठी पर्वणी! अनुभवा स्वामींचे अलौकिक गणेश रूप, उलगडणार भक्तीचा खरा मार्ग

Jai Jai Swami Samarth Serial Update : 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेत स्वामींचे अलौकिक गणेश रूप पाहायला मिळणार आहे. मालिकेचे अपडेट जाणून घ्या.
Jai Jai Swami Samarth Serial Update
Jai Jai Swami SamarthSAAM TV
Published On

मालिका कायमच प्रेक्षकांचे बंपर मनोरंजन करतात. सणासुदीला मालिकांचे विशेष भाग दाखवले जातात. तसेच आता माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेचा विशेष भाग दाखवण्यात येणार आहे.

'जय जय स्वामी समर्थ' (Jai Jai Swami Samarth) मालिकेमध्ये माघी गणेश जयंतीला अनुभवूया स्वामींचे अलौकिक गणेश रूप दर्शन. यंदाचा माघी गणेशोत्सव स्वामी भक्तांसाठी अलौकिक पर्वणी ठरणार आहे. स्वामींचे अलौकिक असे प्रत्यक्ष गणेश रूप दर्शन घराघरात घडणार आहे. अक्कलकोटातील एका अत्यंत विपन्न अवस्थेत असलेल्या घरात स्वामी प्रवेश करतात आणि घोषित करतात की यंदा माघी गणेशोत्सव दणक्यात साजरा करायचा.

आधीच गरिबीत असलेल्या दोन मुलांचा कसाबसा सांभाळ करणाऱ्या त्या कुटुंबाचा प्रमुख गयावया करतो की, स्वामी हे कसे शक्य आहे? आम्ही या आधी गणपती कधीच घरी आणला नाही. स्वामी म्हणतात, "देव तुम्ही आणता हा गैरसमज आहे, देव त्याच्या मर्जीने येतो. गणपतीची मूर्ती स्वत:हून चालत येईल." स्वामी असे का म्हणतात, या कुटुंबाच्या बाबतीत स्वामी ही लीला का घडवतात? विघ्नहर्त्याचे स्मरण का करवतात? हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेत भक्तीचा खरा मार्ग दाखवणारी अत्यंत रंजक गोष्ट उलगडणार आहे. स्वामींचे अलौकिक गणेश रूप दर्शन हा भक्ती आणि श्रद्धेचा परमोच्च बिंदू पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. हा भक्तीचा अलौकिक नजारा तुम्ही रविवारी २ फेब्रुवारीला दुपारी २.०० वाजता आणि रात्री ८.०० वाजता पाहू शकता.

Jai Jai Swami Samarth Serial Update
Mahakumbh 2025: हेमा मालिनी महाकुंभमेळ्यात सहभागी; त्रिवेणी संगमावर केलं पवित्र अमृतस्नान, VIDEO व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com