मुंबई : बॉलिवूडचा 'दबंग' सलमान खान(salman Khan) आणि त्याची कथित गर्लफ्रेंड युलिया वंतूर(Iulia Vantur) अनेक ठिकाणी एकत्रित दिसून येतात. नुकताच युलिया वंतूरने तिचा वाढदिवस साजरा केला. सलमान खानसह अनेक बॉलिवूड स्टार्सही पार्टीत उपस्थित होते. युलियाच्या वाढदिवसाच्या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये सलमान खान देखील दिसत आहे. अभिनेत्री आणि गायिका युलिया वंतूरने रविवारी तिचा वाढदिवस साजरा केला. या पार्टीमध्ये सलमानचा भाऊ सोहेल खान, मेहुणा आयुष शर्मा, संगीतकार साजिद यांनीही हजेरी लावली.
वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा फोटो शेअर करताना, अभिनेता आणि सलमान खानचा मेहुणा, आयुष शर्माने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर लिहिले, 'युलिया तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तू नेहमी हसत राहा आणि खुश राहा'. फोटोमध्ये युलिया वन-शोल्डर ब्लॅक ड्रेसमध्ये सलमानच्या शेजारी उभी असलेली दिसत आहे. सलमान खानने ब्लॅक शर्ट आणि ट्राउजर परिधान केले आहे. आपल्या बीझी शेड्युलमधून वेळ काढून युलियाच्या पार्टीत पोहोचलेल्या सलमान खानने तिला एक सुंदर सरप्राईज दिले आहे.
युलिया वंतूरने तिचा केक कटिंगचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये स्टार्स पार्टीमध्ये धमाल करताना दिसत आहेत. युलियाने बर्थडे पोस्ट शेअर करताना, 'आज मी खूप आनंदी आहे, माझ्या आयुष्यात चांगली माणसे मिळाल्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. धन्यवाद मित्रांनो, माझा वाढदिवस इतका खास बनवल्याबद्दल... तेही कोणतीही प्लानिंग नसताना...फक्त मनापासून... तुमच्या सगळ्यांमुळे माझे आयुष्य चांगलं झालं आहे. तुमच्या मॅसेज, प्रेम आणि शुभेच्छांबद्दल धन्यवाद, असे तिने पोस्टमध्ये म्हटलं असून, सर्वांचेच आभार मानले आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.