Ranveer Singh: भारतातील सर्वात महागड्या जाहिरातीसाठी रणवीर सिंग आणि लॉर्ड बॉबी एकत्र; बजेट पाहून नेटकरी व्हाल थक्क

Indian TV Most Expensive Ad: रणवीर सिंग, बॉबी देओल आणि अभिनेत्री श्रीलीला हे चिंगच्या जाहिरातीत काम करणार आहेत. या जाहिरातीचा ट्रेलर देखील प्रदर्शित झाला आहे.
Indian TV Most Expensive Ad
Indian TV Most Expensive AdSaam Tv
Published On

Ranveer Singh: रणवीर सिंग, बॉबी देओल आणि श्रीलीला हे तिघे चिंगच्या शेजवान चटणीच्या जाहिरातीत एकत्र दिसणार आहेत. या जाहिरातीचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. संपूर्ण जाहिरात १९ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. चिंगची ही जाहिरात भारतातील सर्वात महागडी जाहिरात असल्याचे म्हटले जात आहे. या जाहिरातीचे बजेट अनेक चित्रपटांच्या बजेटपेक्षा जास्त आहे. या जाहिरातीचा ट्रेलर पाहिल्यानंतर नेटकरी म्हणत आहेत की त्यांना वाटले की हा एक अॅक्शन चित्रपट असू शकतो.

भारतातील सर्वात महागडी जाहिरात

ही जाहिरात अॅक्शन, गाणी आणि भरपूर मसाला यांनी भरलेली आहे. बॉलीवूड हंगामाच्या वृत्तानुसार, या चित्रपटाचे बजेट सुमारे १५० कोटी रुपये आहे. ही जाहिरात भारतातील सर्वात महागडी जाहिरात असल्याचे सांगितले जात आहे. जाहिरातीत व्हीएफएक्स आणि भव्य सेट्स वापरण्यात आले आहेत.

Indian TV Most Expensive Ad
Box Office Collection: 'कांतारा'ची बॉक्स ऑफिसवर गर्जना; तर 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' निघावला फुसका बार

अ‍ॅटली यांनी ही जाहिरात दिग्दर्शित केली

वृत्तानुसार, शाहरुख खानच्या जवानचे दिग्दर्शन करणाऱ्या अ‍ॅटली कुमार यांनी ही जाहिरात बनवली आहे. या जाहिरातचे बजेट इतके मोठे आहे की ते अनेक बॉलिवूड चित्रपटांच्या बजेटपेक्षा जास्त आहे. उदाहरणार्थ, या जाहिरातचे बजेट विकी कौशलच्या छावा (१३० कोटी) आणि अजय देवगणच्या रेड २ (१२० कोटी) पेक्षा जास्त आहे.

Indian TV Most Expensive Ad
Bigg Boss 19: 'तू खूप निर्लज आणि इरिटेटिंग...'; शेहबाजवर संतापला सलमान खान, पाहा VIDEO

या जाहिराततीत रणवीर सिंग त्याच्या डॅशिंग लूकमध्ये दिसत आहे. तो जाहिराततीत एजंट चिंगची भूमिका करतो. ही जाहिरात चिंगच्या शेझवान चटणीसाठी करण्यात आली आहे. रणवीर सिंग २०१४ पासून चिंगचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com