Director House Demolished : ऑस्कर मिळालेल्या प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शकाचं घर पाडलं, सरकारची कारवाई; काय आहे नेमकं कारण? वाचा

Satyajit Ray House : सत्यजित रे यांचे बांगलादेशमधील वडिलोपार्जित १०० वर्षे जुनं घर अखेर पाडण्यात आलं. भारत सरकारच्या विनंतीनंतरही बांगलादेशने ते जतन केलं नाही. या कृतीमुळे सांस्कृतिक वारसा नष्ट झाल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
Satyajit Ray House Demolished
Satyajit Ray House DemolishedSaam Tv
Published On

भारताचे महान फिल्ममेकर सत्यजित रे याचं घर पाडण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. १९५५ साली सत्यजित रे 'पाथेर पांचाली' या चित्रपटातुन घराघरात पोहचले. या चित्रपटातून त्यांना प्रसिद्धी मिळाली. वयाच्या ७०व्या वर्षी सत्यजित रे यांचं निधन झालं. मूळचे बांगलादेशचे असलेल्या सत्यजित रे यांचं वडिलोपार्जित १०० वर्षे जुनं घर पाडण्यात आलं आहे. दरम्यान केंद्र सरकारने बांगलादेशला रे यांचं घर पाडू नका अशी विंनती करूनही ते पाडण्यात आलं आहे.

ढाका येथील ऑस्कर विजेते तसेच चित्रपट निर्माते सत्यजित रे यांचं वडिलोपार्जित घर बांगलादेशाच्या मैमनसिंह भागात आहे. प्रसिद्ध कवी सुकुमार रे यांचे वडील आणि चित्रपट निर्माते सत्यजित रे यांचे आजोबा, प्रसिद्ध साहित्यिक उपेंद्र किशोर रे चौधरी हे या घरात राहत होते. ही १०० वर्षे जुनी मालमत्ता आता पाडण्यात आली आहे. या ठिकाणी मुलांची अकादमी चालवली जात होती. परंतु गेल्या १० वर्षांपासून इमारतीच्या खराब स्थितीमुळे येथून अकादमी चालवली जात नव्हती. या घराची अवस्था अगदी खिळखिळीत झाली होती. त्यामुळे बांगलादेश सरकारने ही वास्तू पाडण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे.

Satyajit Ray House Demolished
Entertainment : अभिनेता चिन्मय मांडलेकरला खंत, हिंदी सिनेमामुळे प्राईम टाईम स्लॉट नाही : SAAM TV

बांगला सांस्कृतिक पुनर्जागरणाचं प्रतीक म्हणून आम्ही या घराकडे पाहतो त्यामुळे हे घर उध्वस्त करण्याआधी विचार करा असे केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले. तसेच भारताला ही इमारत जतन करायची होती. यासाठी बांगलादेशला इमारतीची दुरुस्ती आणि पुनर्बांधणी करण्याची ऑफरही दिली होती. असं ही म्हटले. या घराची डागडुजी करून ते दुरुस्त करून पुन्हा उभं कसं राहील या पर्यायांचा विचार करावा असेही केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान आता बांगलादेश सरकारकडून काय निर्णय घेतला जाईल? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Satyajit Ray House Demolished
#boycottbollywood : ‘बॉयकॉट बॉलिवूड’ ट्रेंडचा इतिहास थोडक्यात जाणून घ्या ! | Entertainment | Movies

'पाथेर पांचाली'ची कहाणी काय ?

'पाथेर पांचाली' हा चित्रपट ग्रामीण बंगाली गावात वाढणाऱ्या अपू आणि त्याची बहीण दुर्गा यांची कथा सांगतो. अपू आणि दुर्गा त्यांच्या बालपणात आलेल्या गरिबीतून कशाप्रकारे मार्ग काढतात हे या चित्रपटातून दाखवण्यात आले आहे. सत्यजित रे यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिला सिनेमा होता. हा चित्रपट मर्यादित बजेटमध्ये बनवण्यात आला होता आणि पूर्ण होण्यासाठी अडीच वर्षे लागली. त्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर समीक्षकांची प्रशंसा मिळाली तसेच कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट मानवी दस्तऐवजासह अनेक पुरस्कार मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com