ganesh chaturthi 2022 : पुण्यात मानाच्या गणपतींना कलाकारांनी ढोल-ताशाचा नादात दिला भावपूर्ण निरोप

मानाच्या पहिल्या कसबा गणपती मिरवणुकीत कलाकारांचे कलावंत ढोल ताशा पथक सहभागी झाले आहे.
ganesh chaturthi 2022
ganesh chaturthi 2022Saam Tv
Published On

पुणे : राज्यातील काही प्रमुख शहरांमध्ये आज लाडक्या गणरायाला (Ganeshotav 2022) निरोप देण्यासाठी भाविक सज्ज झाले आहेत. मुंबई, पुणे, नाशिक ई. शहरांमध्ये गणेश मिरवणुकीची चांगलीच धुम पाहायला मिळत आहे. भव्य दिव्य रांगोळी, ढोल ताशे पथक, लाडक्या भक्तांची गर्दी, फुलांचा सडा यामुळे विसर्जनाची शोभा आणखी वाढली.

ganesh chaturthi 2022
Bigg Boss Marathi : महेश मांजरेकर लवकरच सांगणार 'राग शांत करण्याचे १०१ उपाय'

गेल्या दोन वर्षात कोरोना(Covid) महामारीमुळे सर्वांनीच सण उत्सव अगदी साधेपणाने साजरे केले. थोडक्यात आणि निर्बंधात सर्वसण साजरे करण्यात आले होते. परंतू यावर्षी कोणत्याच गोष्टीची कमी न भासवता, भाविकांनी आपला हात न आखडता आनंद साजरा केला. आज लाडक्या गणरायाला निरोप द्यायला अगदी लहानांपासून अबाल वृद्धांची गर्दी जमली होती. पुण्यातील लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी चांगलीच जय्यत तयारी करण्यात आली आहे.

ganesh chaturthi 2022
Yashoda Teaser : समंथा दिसणार प्रेग्नंट लेडीच्या भूमिकेत; अ‍ॅक्शन, थ्रिलर, सस्पेंसने भरलेला 'यशोदा'चा टीझर लॉन्च

पुण्यात मानाच्या गणपतीसह इतर मंडळांनी विसर्जन मिरवणुकीची धुमधडाक्यात तयारी केली आहे. विशेष म्हणजे मानाच्या पहिल्या कसबा गणपती मिरवणुकीत कलाकारांचे कलावंत ढोल ताशा पथक सहभागी झाले आहे. यामध्ये अभिनेता सौरभ गोखले, सिद्धार्थ जाधव, आस्ताद काळे, केतन क्षीरसागर, तेजस बर्वे तसेच अभिनेत्री अनुजा साठे, तेजस्विनी पंडित, श्रुती मराठे, स्वप्नाली पाटील, नुपूर दैठणकर, शाश्वती पिंपळीकर, नीता दोंदे सहभागी झाले आहेत. या सर्व कलाकारांनी ढोल-ताशाचा नादात बाप्पाला निरोप दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com