Hrithik Roshan: ऋतिक व राकेश रोशन दिसणार एकत्र, मुलगा अन् वडिलांच्या नात्याची गोष्ट उलगडणार

Hrithik Roshan And Rakesh Roshan: नवीन जाहिरातीमध्‍ये बॉलिवूड आयकॉन ऋतिक रोशन आणि त्‍याचे वडिल भारतीय चित्रपट निर्माते व दिग्‍दर्शक राकेश रोशन पडद्यावर एकत्र आले आहेत.
Entertainment News
Hrithik RoshanSaam Tv
Published On

एक्‍सॉनमोबिल ल्‍युब्रिकण्‍ट्स प्रा. लि. या भारतातील मोबिल™ ब्रॅण्‍डेड ल्‍युब्रिकण्‍ट्सची विक्री करणाऱ्या एक्‍सॉनमोबिल सहयोगी कंपनीने आज त्‍यांच्या सुरू असलेल्‍या 'अनफर्गेटेबल जर्नी' मोहिमेचा भाग म्‍हणून नवीन जाहिरातीच्‍या लाँचची घोषणा केली. या जाहिरातीमध्‍ये जगातील आघाडीचा सिन्‍थेटिक इंजिन ऑईल ब्रँड मोबिल १™ वर विशेष प्रकाश टाकण्‍यात आला आहे. बॉलिवुड आयकॉन ऋतिक रोशन असलेली ही जाहिरात ऋतिकची ड्रायव्हिंग, ड्रिमर्स व डूअर्सचा देश म्‍हणून भारत आणि मोबिल १™ ची कार्यक्षमता यांमधील शक्तिशाली समन्‍वयाला सादर करते, जेथे या सर्व बाबी समान आवड आणि सर्वोत्तमतेसाठी निरंतर प्रयत्‍नाद्वारे एकत्रित आल्‍या आहेत.

Entertainment News
Raid 2 Box Office Collection : रितेश देशमुखचा 'रेड 2' लवकरच करणार बजेट वसूल, दुसऱ्या दिवशी कमाई किती?

नवीन जाहिरातीमध्‍ये बॉलिवूड आयकॉन ऋतिक रोशन आणि त्‍याचे वडिल भारतीय चित्रपट निर्माते व दिग्‍दर्शक राकेश रोशन पडद्यावर एकत्र आले आहेत. ऋतिक चित्रपट 'कहो ना प्‍यार है'मधील यशस्‍वी पदार्पणापासून चित्रपटसृष्‍टीमध्‍ये २५ वर्षे साजरी करत असताना ही मोहिम संस्‍मरणीय परफॉर्मन्‍स देण्‍यासाठी त्‍याची अविरत आवड आणि सर्वोत्तमतेप्रती प्रयत्‍नाला प्रशंसित करते. त्‍याच्‍या प्रवासामधून भारत एक देश म्‍हणून दिसून येतो, जेथे ड्रिमर्स विषमतांवर मात करतात आणि डूअर्स महत्त्वाकांक्षांना यशामध्‍ये बदलतात. यामधून सतत विकसित होत असलेल्‍या देशाचा उत्‍साह दिसून येतो, जेथे प्रत्‍येक पिढी सर्वोत्तम भविष्‍याचे स्‍वप्‍न पाहण्‍याचे धाडस करते आणि ते स्‍वप्‍न पूर्ण करण्‍यासाठी अथक मेहनत घेते. हाच उत्‍साह शेअर करत मोबिल १™ ब्रँड, जो इंजिन ऑईलच्‍या क्षमतांना सतत नव्‍या उंचीवर घेऊन जात आहे. अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाचे पाठबळ असलेला हा ब्रँड काळासह विकसित होत सर्वात नाविन्‍यपूर्ण आणि उच्‍च कार्यक्षम इंजिन ऑईल्‍स देत आहे, जे वेईकलमधील इंजिनला नवीन असल्‍याप्रमाणे कार्यरत ठेवतात.

एक्‍सॉनमोबिल ल्‍युब्रिमण्‍ट्स प्रायव्‍हेट लिमिटेडच्‍या व्‍यवस्‍थापकीय संचालक चार्लीन परेरा म्‍हणाल्‍या, ''दशकापासून मोबिल १™ ने खडतर स्थितींमध्‍ये उत्तम कामगिरी करून दाखवली आहे, जेथे हे इंजिन ऑईल लॅब-टेस्टेड, रस्‍ता-संचालित आणि ट्रॅक-प्रमाणित आहे, तसेच इंजिन दीर्घकाळपर्यंत प्रवास केल्‍यानंतर देखील उत्तम स्थितीत राहतात. मोबिल १™ ब्रँड सर्वात नाविन्‍यपूर्ण आणि उच्‍च कार्यक्षम इंजिन ऑईल देण्‍याप्रती कटिबद्ध आहे, जे वेईकलमधील इंजिनला नवीन असल्‍याप्रमाणे कार्यरत ठेवतात, ज्‍यामुळे तुम्‍ही मुक्‍तपणे भारतात एक्‍स्‍प्‍लोअर करू शकता आणि जीवनाचा पुरेपूर आनंद घेऊ शकता.''

२०२३ मध्‍ये मोबिल™चे ब्रँड अॅम्‍बेसेडर म्‍हणून सामील झालेले अभिनेते ऋतिक रोशन यांनी 'अनफर्गेटेबल जर्नी' मोहिम सुरू ठेवण्‍याबाबत आपला आनंद व्‍यक्‍त केला. या मोहिमेबाबत सांगताना ते म्‍हणाले, ''मोबिल १™ ब्रँडसोबतचा माझा सहयोग नेहमी प्रभावी राहिला आहे. हा इंजिन ऑईल ब्रँड उच्‍च कार्यक्षमता व नाविन्‍यतेसाठी ओळखला जातो, जेथे या पैलूंमधून आत्‍मविश्‍वासपूर्ण ड्रायव्हिंगची खात्री मिळते. 'अनफर्गेटेबल जर्नी' मोहिमेमधून माझा स्‍वत:चा विश्‍वास दिसून येतो, तो म्‍हणजे जीवन फक्‍त गंतव्‍यांपर्यंत पोहोचण्‍यापुरती मर्यादित नाही, तर अनुभव महत्त्वाचे आहेत, जे अनफर्गेटेबल जर्नीला आकार देतात. या मोहिमेने मला असे संस्‍मरणीय आणि अविश्‍वसनीयरित्‍या विशेष अनुभव दिला आहे, तसेच पहिल्‍यांदाच माझ्या वडिलांसोबत स्क्रिन शेअर करण्‍याची संधी देखील दिली आहे.''

Entertainment News
Ajaz Khan : 'हाऊस अरेस्ट' शोच्या अडचणी वाढल्या, एजाज खान विरोधात गुन्हा दाखल

भारतीय चित्रपट निर्माते व दिग्‍दर्शक राकेश रोशन म्‍हणाले, ''मला पहिल्‍यांदाच माझा मुलगा ऋतिक रोशनसोबत स्क्रिन शेअर करण्‍याचा आनंद होत आहे. हा माझ्यासाठी वडिल म्‍हणून, तसेच त्‍याचा अविश्‍वसनीय प्रवास पाहिलेला व्‍यक्‍ती म्‍हणून खास क्षण आहे. 'अनफर्गेटेबल जर्नी' मोहिमेमधील आमचा सहयोग अधिक अर्थपूर्ण वाटतो, जेथे आम्‍ही दोघे सर्वोत्तमतेप्रती प्रयत्नांसाठी आवड शेअर करतो.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com