Hrithik Roshan Goes Shirtless : 'जादू' है, तेरा ही जादू... हृतिकचा शर्टलेस मस्क्युलर बॉडी लूक व्हायरल

Hrithik Roshan Share Photo: हृतिक भर उन्हात कार्डिओ वर्कआउट करताना दिसत आहे.
Hrithik Roshan Shirtless Photo
Hrithik Roshan Shirtless Photo Instagram @hrithikroshan
Published On

Hrithik Roshan Fitness : हृतिक रोशनची फिटनेस पाहून कोणी त्याच्या वयाचा अंदाज लावू शकत नाही. हृतिक ४९ वर्षाचा आहे आणि एकदम फिट आहे. हृतिक त्याच्या पुढच्या 'फायटर'साठी शूटिंग करत आहे. काही काळापासून तो या चित्रपटासाठी कठोर प्रशिक्षण घेत आहे. पण त्याच्या नव्या फोटोने इंटरनेटवर वातवरण गरम केले आहे. नेटिझन्स त्याच्यावर कमेंट करणे थांबवू शकले नाहीत.

हृतिक भर उन्हात कार्डिओ वर्कआउट करताना दिसत आहे. हृतिक या फोटोमध्ये शर्टलेस असून त्याने डेनिम्स जीन्स घातली आहे. त्याच्या जीन्सचे बटण उघडे असल्याचे देखील नेटिझन्सच्या लक्षात आले आहे. त्याने टोपी आणि चष्मा घातलेला आहे. (Latest Entertainment News)

Hrithik Roshan Shirtless Photo
Sushant Singh Rajput Death Anniversary: सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासाचं पुढे काय झालं? चाहते तीन वर्षानंतरही प्रतीक्षेत

हा फोटो पोस्ट करत हृतिकने एक महत्त्वाची टिप शेअर केली आहे, वजन लवकर कमी करण्यासाठी सूर्यप्रकाशात राहणे आवश्यक आहे. हृतिक रोशनने लिहिले, "जेव्हा तुम्हाला झपाट्याने वजन कमी करणे आवश्यक असते, तेव्हा व्हिटॅमिन 'डी’ (धूप)पेक्षा काहीही उत्तम काम करत नाही! पिवळा निळा होण्यापूर्वी सगळं शोषून घ्या. #keepgoing"

'कोई मिल गया'च्या चाहत्यांना माहित आहे की 'धूप' चित्रपटाशी कसे निगडित आहे. जादूला त्याची गरज होती आणि त्यामुळे हृतिकने कॅप्शन पाहून त्यांना चित्रपटाची आठवण झाली. हृतिक आणि 'कोईल मिल गया' चित्रपटाचे चाहते नॉस्टॅल्जिक झाले. त्याच्या या पोस्टवर चाहते भरभरून कमेंट करत आहेत.

हृतिक रोशन 'फायटर' या ऍक्शन चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटामध्ये हृतिक पहिल्यांदाच एअर फोर्स ऑफिसरची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटामध्ये दीपिका पदुकोण, अनिल कपूर, कारण सिंग ग्रोव्हर, अक्षय ओबेरॉय दिसणार आहेत. जा चित्रपट २०२४ च्या जानेवारीमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात आहे.

तर दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद हृतिकसह वॉर २ वर देखील काम करत आहेत. पण या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी करणार आहे. या चित्रपटामध्ये ज्युनियर एनटीआर देखील दिसणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com