Hrithik And Deepika: हृतिक रोशन आणि दीपिकाच्या पदुकोणच्या चित्रपटासाठी प्रेक्षकांना कधीपर्यंत पाहावी लागणार वाट, जाणून घ्या

फायटर हा भारतातील पहिला एरियल अॅक्शन चित्रपट असेल. हृतिक दीपिका पहिल्यांदा एकत्र काम करणार आहेत.
Hrithik Deepika Upcoming Movie Fighter
Hrithik Deepika Upcoming Movie FighterSaam Tv
Published On

Hrithik Deepika Upcoming Movie: हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांच्या प्रमुख भूमिका असलेला आणि अॅक्शनने भरलेला फायटर 25 जानेवारी, 2024 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात कलाकार भारतीय वायुसेनेच्या पायलटची भूमिका साकारणार आहेत. नुकताच निर्मात्यांनी चित्रपटाचा अधिकृत पोस्टर प्रदर्शित केला आहे. तसेच चित्रपट केव्हा प्रदर्शित होईल याची तारीख जाहीर केली. या चित्रपटात अनिल कपूर देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. भारताच्या सशस्त्र दलांना आदरांजली अर्पण करणारा हा चित्रपट प्रजासत्ताक दिनाच्या आठवड्यात प्रदर्शित करणे योग्य ठरेल, असे निर्मात्यांचे म्हणणे आहे.

Hrithik Deepika Upcoming Movie Fighter
Kangana Ranaut: २०२४ मध्ये कंगना रनौत निवडणूक लढवणार?, PM मोदींना 'महापुरूष' म्हणून संबोधले

फायटर हा भारतातील पहिला एरियल अॅक्शन चित्रपट असेल. हृतिकने दीपिकासोबत एकत्र काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. निर्माता आणि वायकॉम 18 स्टुडिओचे सीओओ अजित अंधारे यांच्या भारतीय चित्रपटसृष्टीत आंतरराष्ट्रीय दर्जाचा अॅक्शन चित्रपट करण्याचं मानस आहे. हा चित्रपट जगभरात चित्रित केला जाणार आहे. या चित्रपटामध्ये निर्मात्यांनी अत्याधुनिक तंत्र आणि तंत्रज्ञान वापरण्याचे वचन दिले आहे. (Hrithik Roshan)

फायटरच्या निर्मात्यांनी ब्रह्मास्त्रमध्ये काम केलेल्या व्हीएफएक्स कंपनीशी चर्चा केल्याची बातमी समोर येत आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित चित्रपटामध्ये डबल निगेटिव्ह या कंपनीने केलेल्या कामाचे खूप कौतुक झाले आहे. फायटर हा एक एअर अ‍ॅक्शन चित्रपट आहे. या चित्रपटातील अ‍ॅक्शन सीक्वेन्स भारतीय प्रेक्षकांसाठी एक अद्वितीय अनुभव असेल. (Movie)

बँग बँग आणि वॉर चित्रपटाला मिळालेल्या भरघोस यशानंतर, हृतिक रोशन पुन्हा सिद्धार्थ आनंदसोबत फायटर चित्रपट करणार आहे. या चित्रपटाला भारतातील पहिला एरियल अॅक्शन थ्रिलर म्हणून ओळखला जाईल. या चित्रपटाचे चित्रीकरण १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com