Actor Passes Away: प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या ६७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Actor Passes Away: हॉलिवूड इंडस्ट्रीमधून एक वाईट बातमी येत आहे. मोठ्या पडद्यावर उत्कृष्ट अभिनयासाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते मायकल मॅडसेन यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले आहे.
Michael Madsen Death
Michael Madsen DeathSaam Tv
Published On

Actor Passes Away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता मायकेल मॅडसेन आता या जगात नाही. वयाच्या ६७ व्या वर्षी या अभिनेत्याचे निधन झाले आहे. या बातमीने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्याच्या निधनाने चाहत्यांना धक्का बसला आहे. अभिनेत्याच्या बहिणीनेही अभिनेत्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

३ जुलै रोजी हॉलिवूड अभिनेता मायकेल मॅडसेन कॅलिफोर्नियातील मालिबू येथील त्यांच्या घरी मृतावस्थेत आढळला. ९० च्या दशकातील सर्वात प्रसिद्ध चेहऱ्यांपैकी एक असलेल्या मायकेल मॅडसेन यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात आहे. अभिनेत्याच्या मृत्यूची बातमी येताच, सेलिब्रिटी आणि चाहते शोकात बुडाले.

Michael Madsen Death
Sitaare Zameen Par Collection: बॉक्स ऑफिसवर चमकले आमिर खानचे नशिब; गुरुवारी केली इतक्या कोटींची कमाई

भावाच्या मृत्यूने व्हर्जिनिया दुखी

मायकेलच्या मृत्यूने त्यांची बहीण व्हर्जिनिया मॅडसेन यांनाही मोठा धक्का बसला आहे. 'साइडवेज' फेम अभिनेत्रीने तिच्या भावाच्या आठवणीत सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, "माझा भाऊ स्टेज सोडून गेला. तो मेघगर्जना आणि मखमलीसारखा होता. तो एका उत्तम अभिनेत्यासह, एक हुशार कवी, एक वडील, एक मुलगा, एक भाऊ होता."

Michael Madsen Death
The Traitors Winner: उर्फी जावेद आणि निकिता लूथर ठरले 'द ट्रेटर्स'चे विजेते; ट्रॉफीसह मिळणार कोट्यवधींचे बक्षीस

मायकेल मॅडसनची कारकीर्द

२५ सप्टेंबर १९५७ रोजी शिकागो येथे जन्मलेल्या मायकेल मॅडसनने ८० च्या दशकात आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. परंतु त्यांना खरी ओळख क्वेंटिन टॅरँटिनोच्या चित्रपटांमधून मिळाली. १९९२ च्या "रिझर्व्हॉयर डॉग्स" या चित्रपटात मिस्टर ब्लोंडच्या भूमिकेने त्यांना रातोरात स्टार बनवले. त्यानंतर त्यांनी टॅरँटिनोसोबत किल बिल: व्हॉल्यूम १, व्हॉल्यूम २, द हेटफुल एट आणि वन्स अपॉन अ टाइम इन हॉलीवूड सारख्या यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com