Hindu Sena Files Writ Petition Against Prabhas Film: ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपट काल थिएटरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. थिएटरमध्ये चित्रपट प्रदर्शित होताच रामभक्तांचा उत्साह सर्वांना दिसून आला. निर्मात्यांनी गेल्या आठवड्यात प्रत्येक स्क्रिनिंगला हनुमानासाठी एक सीट असणार, असा निर्णय घेतल्यानंतर निर्मात्यांवर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव झाला. पण चित्रपटावर जरी सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत असला तरी, चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दिवशी चित्रपटाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
जरी चित्रपटावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत असला तरी, एका हिंदू संघटनेने चित्रपटाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. या चित्रपटाविरोधात हिंदू सेनेच्या वतीने दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या चित्रपटामुळे रामायण, प्रभु श्रीराम आणि देशाच्या संस्कृतीची खिल्ली उडवली जात असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.
दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या या याचिकेत संघटनेने चित्रपटावर अनेक आरोप केले आहेत. या चित्रपटात रामायण, प्रभु श्रीराम आणि आपली संस्कृती यांची खिल्ली उडवली आहे, असे याचिकेत म्हटले आहे. याशिवाय हिंदू सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी या याचिकेत ‘आदिपुरुष’ चित्रपटातील रावण, प्रभु श्रीराम, सीता आणि हनुमान यांच्याशी संबंधित कथित आक्षेपार्ह दृश्ये हटवण्याची मागणीही दिल्ली न्यायालयाकडे केली आहे. हे दृश्य रामायणातील धार्मिक पात्रांच्या चित्रणाच्या विरुद्ध असल्याचे याचिकाकर्त्यांचे मत आहे.
दुसरीकडे, सॅकनिल्कच्या अहवालानुसार, ‘आदिपुरुष’ चित्रपटातील सुमारे १० लाख तिकिटे प्रदर्शनापुर्वीच ॲडव्हान्स बुकिंग करून ठेवण्यात आली होती. त्या आकडेवारीनुसार हा चित्रपट पहिल्याच दिवशी बंपर कमाई करेल असा अंदाज वर्तवला जात होता, मात्र चित्रपटाने पहिल्याच दिवशी ९५ कोटींची कमाई केली आहे. मात्र, अनेक प्रेक्षकांनी चित्रपटात दाखवण्यात आलेल्या व्हीएफएक्सला बालिश म्हणून त्याचे वर्णन केले आहे.
आदिपुरुष चित्रपट १६ जूनला थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात प्रमुख भूमिकेत प्रभास प्रभु श्री रामांच्या, क्रिती सेनन माता जानकीच्या तर, सनी सिंग लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसणार आहे. सोबतच देवदत्त नागे हनुमानाच्या तर, सैफ अली खान रावणाची व्यक्तीरेखा साकारतोय. चित्रपटातील कलाकारांनी ही तगड मानधन घेतले आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाआधीच कोट्यावधींची कमाई केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.