Yash Kumar Nidhi Jha: मुलाला पहिल्यांदा पाहताच अभिनेत्याला अश्रू अनावर, पाहा VIDEO

Yash Kumar Nidhi Jha Become Second Time Parent: प्रसिद्ध भोजपुरी अभिनेता यश कुमार पुन्हा बाबा झालाय. निधीने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. त्याला पाहताच यश भावूक झाल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.
 भोजपुरी अभिनेता यश कुमार
Yash Kumar Nidhi JhaSaam Tv

अभिनेत्री निधी झा आणि यश कुमार लग्नाच्या दीड वर्षांनंतर आईबाबा झाले. एप्रिल हा महिना या जोडप्यासाठी खूपच खास ठरला आहे. ३० एप्रिलला या जोडप्याला पुत्ररत्नाचा लाभ झालाय, त्यांनी भगवान शंकराच्या नावावरून आपल्या मुलाचे नाव ठेवले आहे. या जोडप्याने हॉस्पिटलमधला व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे.

निधी आणि यश (Yash Kumar) हे भोजपुरी चित्रपटातील प्रसिद्ध जोडपं आहे. लग्नाच्या दीड वर्षानंतर त्यांच्या घरात पाळणा हलला आहे. निधीने एप्रिल महिन्यात बाळाला जन्म दिला असून आता एका महिन्याने या जोडप्याने हॉस्पिटलमधला एक व्हिडिओ शेअर केला आहे, यात मुलाला पाहून यशला अश्रू अनावर झालेले पाहायला मिळत आहे. यश आणि निधीच्या मुलाचे नाव 'शिवाय' असे आहे. त्यांनी भगवान शंकराच्या नावावरून हे नाव ठेवले आहे. मुलासोबतच्या यश-निधीच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून समिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. एकीकडे यश-निधिच्या चाहत्यांनी त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे तर दुसरीकडे काही नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल देखील केले आहे. या ट्रोलमागचे नेमकं कारण काय? जाणून घेऊ या.

यशला ट्रोल करण्यामागचे कारण काय ?

मुलाच्या जन्मानंतरचा व्हिडिओ यश-निधीने (Nidhi Jha) सोशल मिडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मुलाला पहिल्यांदा पाहताच यशला अश्रू अनावर होऊन रडू फुटले होते. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले आहे. नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की ' यशला मोठी मुलगी देखील आहे, त्यामुळे तो पहिल्यांदा तर बाप बनत नाही आहे मग एवढं काय रडायचं. तर काहींनी मुलीच्या जन्मानंतर सुद्धा एवढाच रडला होतास का? असे प्रश्न देखील केले आहेत.

पहिल्यांदा मुलाला पाहून 'यश'च्या भावना अनावर

सोशल मीडियाच्या माध्यमातून यश कायम आपल्या चाहत्यांसोबत जोडलेला असतो. आपल्या आयुष्यातील घटना त्यांच्यासोबत शेअर करत असतो. लग्नाच्या दीड वर्षांनी त्याला पुत्ररत्नाच्या लाभ झाला (Bhojpuri Couple) असून हा क्षण त्या दोघांसाठीही खूप आनंदाचा ठरला. आता याच आनंदाच्या क्षणाचा व्हिडिओ या जोडप्याने आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये नर्स मुलाला यशच्या हातात देताना दिसत आहे. मुलाला पाहता क्षणी अभिनेत्याच्या भावना अनावर होऊन तो रडायला लागतो. यशच्या डोळ्यांतील आनंदाश्रू अनेकांना भावनिक करून गेले (Entertainment Marathi News) आहेत, त्यानंतर निधी मुलाला कुशीत घेऊन प्रेम करताना दिसत आहे. यश आणि निधीच्या आयुष्यातील हा सुंदर क्षण त्यांनी कॅमेरात टिपला असून आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

 भोजपुरी अभिनेता यश कुमार
Actor Chandrakanth Dies : जवळच्या मैत्रिणीचा कार अपघातात मृत्यू, नैराश्यात बुडालेल्या अभिनेत्याने संपवलं जीवन

निधी-यशची लव्हस्टोरी

आपण निधी आणि यशची लव्हस्टोरी जाणून घेऊ या. निधीला भेटण्याअगोदरच यश विवाहित होता. निधी आणि यशने अनेक भोजपुरी चित्रपटांतून काम काम केले आहे. चित्रपटाच्या सेटवर या दोघांची मैत्री झाली होती. परंतु २०१३ साली यशने अभिनेत्री अंजना सिंहसोबत लग्न केलं होतं. परंतू २०१८ मध्ये ते दोघे वेगळे झाले. यश आणि अंजनाला एक मुलगा देखील आहे. २०२२ मध्ये यश निधीसोबत लग्नबंधनात अडकला.

यशने दिल सावरिया, दरिया दिल, बालम रसिया, सपेरा अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. निधी बालिका वधू या टिव्ही शोमुळे प्रेक्षकांच्या घराघरात पोहचली आहे.तसेच तिने बेइंतेहा या कार्यक्रमात देखील काम केले आहे. याशिवाय निधी गदर, ट्रक डाइवर 2, जिद्दी , जय हो अशा भोजपुरी चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

 भोजपुरी अभिनेता यश कुमार
Pankaj Jha Accused Actor Pankaj Tripathi : 'स्ट्रगलचा ढोल बडवणारे...', 'पंचायत'मधील आमदाराचा पंकज त्रिपाठींवर निशाणा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com