Hera Pheri 3: अक्षय कुमार-परेश रावल यांच्यातील वाद चित्रपटसाठी केलेला पब्लिसिटी स्टंट! केआरकेचा धक्कादायक दावा

Hera Pheri 3 Controversy: बॉलिवूडच्या 'हेरा फेरी 3' या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या निर्मितीमध्ये अलीकडेच एक नाट्यमय वळण आले आहे. परेश रावल यांनी या चित्रपटातून बाहेर पडल्याची घोषणा केली, ज्यामुळे चाहते निराशा झाले आहेत.
Hera Pheri 3 Controversy
Hera Pheri 3 ControversySaam Tv
Published On

Hera Pheri 3 Controversy: बॉलिवूडच्या 'हेरा फेरी 3' या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या निर्मितीमध्ये अलीकडेच एक नाट्यमय वळण आले आहे. परेश रावल यांनी या चित्रपटातून बाहेर पडल्याची घोषणा केली, ज्यामुळे चाहत्यांमध्ये निराशा पसरली. या निर्णयानंतर, अक्षय कुमार यांच्या प्रॉडक्शन हाऊसने परेश रावल यांच्यावर २५ कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईसाठी कायदेशीर नोटीस पाठवली. त्यामुळे या वादामुळे चित्रपटाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या वादावर प्रतिक्रिया देताना, अभिनेता कमाल आर. खान (केआरके) ने ट्विटरवर एक धक्कादायक दावा केला आहे. त्याच्या मते, अक्षय कुमार आणि परेश रावल यांच्यातील हा वाद केवळ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रचलेला एक पीआर स्टंट आहे. त्याने लिहिले, "मला सर्व माहिती मिळाली आहे. अक्षय कुमार आणि परेश रावल यांचा वाद केवळ चित्रपटाचा विषय 'हॉट' टॉपिक बनवण्यासाठी आहे. कोणताही कॉर्पोरेट या चित्रपटात गुंतवणूक करण्यास तयार नाही, त्यामुळे हा सर्व प्रकास प्रमोशनसाठी करत आहेत."

Hera Pheri 3 Controversy
Bhool Chuk Maaf VS Kesari Veer: बॉक्स ऑफिसवर 'भूल चूक माफ'चा जलवा कायम; 'केसरी वीर' आणि 'कंपकंपी'ला मोठा झटका

दरम्यान, 'हाऊसफुल 5' च्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये अक्षय कुमारने या वादावर प्रथमच प्रतिक्रिया दिली. त्याने म्हटले, "मी ३२ वर्षांपासून परेश रावल यांच्यासोबत काम करत आहे. आम्ही चांगले मित्र आहोत. तो एक महान अभिनेता आहे. मी त्याचा खूप आदर करतो. हा विषय गंभीर आहे आणि न्यायालयातच हाताळला जाईल. त्यामुळे मी येथे यावर अधिक बोलणार नाही."

Hera Pheri 3 Controversy
Deepika Padukone: 'मी माझ्या निर्णयांवर ठाम...; 'स्पिरिट' चित्रपटाच्या वादावर दीपिका पदुकोण स्पष्टच बोलली

१९ वर्षांनंतर, प्रियदर्शन त्याच्या हिट फ्रँचायझीचा म्हणजेच 'हेरा फेरी ३' ची घोषणा करण्यात आली होती. 'हेरा फेरी' २००० मध्ये आला नंतर २००६ मध्ये 'फिर हेरा फेरी' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रियदर्शनने अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल हे हिट त्रिकूट हेरा फेरीसाठी परत येणार असल्याची घोषणा केली होती. पण परेश रावलने चित्रपट सोडल्यामुळे चाहते निराश झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com