Krantijyoti Vidyalay: नवीन वर्षात भरणार मराठी शाळा; 'क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम' नूतनवर्षी प्रेक्षकांच्या भेटीला

Krantijyoti Vidyalay Marathi Medium: ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ हा चित्रपट १ जानेवारी २०२६ पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी शाळा, मातृभाषा आणि मराठी शिक्षणाचं महत्त्व हृदयस्पर्शीपणे उलगडले आहे.
Krantijyoti Vidyalay Marathi Medium
Krantijyoti Vidyalay Marathi MediumSaam Tv
Published On

Krantijyoti Vidyalay Marathi Medium: झिम्मा, झिम्मा २ आणि फसक्लास दाभाडेच्या यशानंतर निर्माती क्षिती जोग आणि लेखक-दिग्दर्शक हेमंत ढोमे या लोकप्रिय जोडीच्या ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ या आगामी चित्रपटाची तारीख जाहीर झाली आहे. नुकतीच सोशल मीडियावर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित करत व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. आता मराठी शाळा पुन्हा भरणार! असं म्हणत हा चित्रपट १ जानेवारी पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठी शाळांची घटती संख्या, मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व आणि मराठी भाषेबद्दलचा गर्व या विषयांचा मनोरंजक तरीही हृदयस्पर्शी पद्धतीने घेतलेला वेध म्हणजे ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’. या चित्रपटात मराठी कलाकारांची दमदार फळी झळकणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर या सर्वांसोबत अभिनेत्री प्राजक्ता कोळी पहिल्यांदाच मराठी चित्रपटात पदार्पण करत आहे. क्षिती जोग यांच्या चलचित्र मंडळी निर्मित ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ येत्या १ जानेवारी २०२६ पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Krantijyoti Vidyalay Marathi Medium
Actress Accident: चालत्या गाडीवर रॉकेट आला अन्...; प्रसिद्ध अभिनेत्रीचा थोडक्यात जीव वाचला

चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, “ या चित्रपटाचा विषय माझ्या अगदी मनाजवळचा आहे. आपल्या मराठी शाळा म्हणजे आपली ओळख. या शाळांमधूनच अनेक पिढ्या घडल्या, अनेक नामवंत मंडळी तयार झाली. पण आज मराठी शाळा कमी होत चालल्या आहेत आणि त्यांचं महत्त्व घटत चाललं आहे.

Krantijyoti Vidyalay Marathi Medium
KBC 17: कृष्णाने अचानक अमिताभ बच्चन यांना विचारली त्यांची फी; बिग बी उत्तर देत म्हणाले...

हेमंत ढोमे पुढे म्हणतात ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ या चित्रपटातून आम्ही या विषयावर मनोरंजनाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय याचा मला खूप आनंद आहे आणि माझ्या याआधीच्या चित्रपटांवर प्रेक्षकांनी जितकं प्रेम केलं तितकंच ते याही चित्रपटावर करतील याची खात्री आहे.”

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com